त्यात " शरद पवारांचे " नाव कुठेही नाही म्हणत तृप्ती देसाईंनी केली केतकी चितळेची पाठराखण !
विचारांचा मुकाबला हा विचारांनीच करायचा --राज ठाकरे
भिवंडी, दिं,१६, अरुण पाटील (कोपर) :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.त्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं असून राज ठाकरेंनी देखील निषेध नोंदवला आहे. विचारांचा मुलाबला हा विचारांनीच करायचा असे सांगत केतकीने ज्या प्रकारे तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या चुकीच्या आहेत असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
केतकी चितळेनी केलेल्या पोस्ट मध्ये " ऐंशी झाली आता उरक, वाट पाहते नरक" हा अपशब्द वापरण्यात आल्याने या प्रकरणा वरून राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तिच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्नही केला होता.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी मात्र केतकीची पाठराखण केली आहे. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केतकी चितळेच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली आहे. की, केतकीच्या पोस्टमध्ये "शरद पवारांचं" नाव कुठेही नाही, असा दावा तिने केला आहे. यासंदर्भात तिने फेसबुकवर एक पोस्टही लिहिली आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ती म्हणते आपल्याकडे "लोकशाही" आहे, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तिने पोस्ट मध्ये लिहिलेल्या "पवार" या शब्दाने ते नक्की शरद पवारां विषयीच लिहिले आहे का? कारण व्यक्तीचे पूर्ण नाव लिहिलेले दिसत नाही. पवार साहेबांविषयी असे त्यांनी जाणून बुजून लिहिले असेल तर चुकीचेच आहे पण केतकी चितळेने जी पोस्ट केली आहे ती चुकीची वाटणाऱ्यांनी तिच्यावर कायदेशीर तक्रारी कराव्यात, तिच्याविषयी चुकीचे शब्द वापरून किंवा तिच्या विरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून आपल्याला संस्कार नाहीत हे दाखवू नये.
टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. नितीन भावे नामक व्यक्तीच्या नावे तिने ही पोस्ट केली आहे. या मध्ये "शरद पवार" यांच्यावर हीन दर्जाची पोस्ट केतकीकडून करण्यात आली आहे. ऐंशी झाले,आता उरक, वाट पाहतोय नरक, अशा प्रकारची असंवेदनशील भाषाही वापरण्यात आली आहे. त्यामुळे केतकी चितळेवर कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment