महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन कडून दहशत पसरविण्याऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई !
कल्याण, बातमीदार : आरोपी, अट्टल गुन्हेगार मजहर उर्फ मज्जू फिरोज शेख वय ३१ वर्ष, रा. खरगा चाळ, रुम नंबर ४, रामबाग, कल्याण पश्चिम अंतर्गत महात्मा फुले स्टेशन येथील मज्जू फिरोज शेख याचेवर जिव मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करण्याची भिती दाखवून खंडणी मागणे, सरकारी नोकरावर हल्ला, विनयभंग, गंभीर दुखापत, अपहरण करणे, दंगल करून मारमारी करणे, जीवे मारण्याची धमकी, जबरी चोरी, अवैध शस्त्रे जवळ बाळगणे, असे गंभीर स्वरूपाचे १६ गुन्हे महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. अशा परिसरात प्रचंड दहशत निर्माण करण्याऱ्या, सार्वजनिक शांततेस धोकादायक झालेल्या आरोपीस एम.पी.डी.ए कायदा १९८१ (सुधारीत १९९६) अन्वये स्थानबध्दतेची कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्याकडून मंजूर करून दि. १४/५/२०२२ रोजी येरवडा कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले.
मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी सार्वजनिक शांततेस धोका निर्माण करणाऱ्या व समाजात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर वेळोवेळी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मा. सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर दत्तात्रय कराळे, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने-पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात आली. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांच्याकडून अशा धोकादायक व सक्रिय गुन्हेगाराची यादी तयार केली असून नजिकच्या काळात अशा अट्टल गुन्हेगारावर कडक कारवाई एम.पी.डी.ए कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपार करण्यात येणार आहेत.
Good work
ReplyDelete