Friday, 20 May 2022

थॉमस चषक विजेत्या बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीचे मुंबई विमानतळावर उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार !

थॉमस चषक विजेत्या बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीचे मुंबई विमानतळावर उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार !


मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :
          क्रीडा क्षेत्रात भारतासाठी एक अभिमानाची संधी आली आहे. बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी काल रात्री थॉमस कप विजेता म्हणून भारतात परतले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झालेल्या चिराग शेट्टीचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्वागत केले. यावेळी भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि गोरेगाव स्पोर्ट्स क्लबचे अधिकारी उपस्थित होते.
           सुवर्णपदक आणि थॉमस चषक विजेते म्हणून पुनरागमन करणाऱ्या चिराग शेट्टी आणि त्याच्या संघाने चौदा वेळच्या विजेत्या इंडोनेशिया बॅडमिंटन संघाचा पराभव करत शानदार विजयाची नोंद केली. भारतासाठी आणि बॅडमिंटनपटूंसाठी हे स्वप्नापेक्षा कमी नव्हते. जे चिराग शेट्टीच्या म्हणण्यानुसार खेळाच्या उत्कटतेने आणि जिंकण्याची जिद्दने मिळवले आहे.
              थायलंडहून परतत असताना आणि दिल्लीला रवाना होत असताना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर खा. गोपाळ शेट्टी, गोरेगाव स्पोर्ट्स क्लब, स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांसह चिराग शेट्टी यांचे स्वागत करण्यात आले. या निमित्ताने  हे विजय भारताचा जगात गौरव करण्याची संधी असल्याचे खा. गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. चिराग शेट्टी आणि जोडीदार सात्विक साईराज रेड्डी बॅडमिंटन संघाचे अभिनंदन करताना खा. गोपाळ शेट्टी यांनीही भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...