Friday, 20 May 2022

शिपिंग कंपनीत नोकरीच्या आमिषाने लाखो - कोरोडाचा गंडा !

शिपिंग कंपनीत नोकरीच्या आमिषाने लाखो - कोरोडाचा गंडा !


कल्याण, हेमंत रोकडे : ठाणे शिपिंग मध्ये नोकरी देण्याच्या अमिषापोटी २३ वर्षीय तरुणाला तब्बल दीड लाखाचा गंडा घातल्या प्रकरणी फिर्यादी ओमकार पाटील यांनी आरोपी रजत पवार याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 


फिर्यादी ओमकार शिवाजी पाटील (२३) रा. कोनगाव, कल्याण याला आरोपी रजत पवार आणि एका अनोळखी महिलेने मार्च २०२२ पासून एस आर मरीन कंपनी, इटरनीटी मॉल, ठाणे याठिकाणी फिर्यादीसह अन्य मुलांना परदेशात शिपिंग कंपनीत नौकरी लावण्याच्या अमिषापोटी तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम रोख, चेकने व गुगल पे व्दारे स्वीकारून नौकरी लावलीच नाही आणि पैसेही परत न दिल्याने अखेर आरोपी रजत पवार आणि सुर्तिका राने या महिलेवर वागळे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...