Friday, 20 May 2022

वैशाली पाटील "मिसेस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल २०२२" च्या विजेत्या ठरल्या !!

वैशाली पाटील "मिसेस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल २०२२" च्या विजेत्या ठरल्या !!


पुणे, प्रकाश संकपाळ - श्रीकी फॅशन क्रिएशन्स आयोजित हुबळी येथे प्रथमच मिसेस युनिटी क्वीन ऑफ इंडिया सीझन २ चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. डॉ. वीरेंद्र कलाक्षेत्र सभागृह, हुबळी येथे आयोजित या भव्य यशस्वी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजेत्या सौंदर्यवतीना थायलंड, मलेशिया आणि दुबई येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होत आहे. तसेच मिसेस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल २०२२ शीर्षक विजेती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 
      या स्पर्धेत पुण्यातील वैशाली पाटील ह्या "मिसेस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल २०२२" विजेत्या ठरल्या आहेत . श्रीकी फॅशन क्रिएशन्स आयोजित श्रीकी फॅशन क्रिएशन्स चे सीईओ श्रीकांत शेटर, मोहम्मद नागमन सीईओ आयकॉनिक प्रॉडक्शन्स, भारताच्या मिसेस युनिटी क्वीनच्या आंतरराष्ट्रीय संचालिका रुजलिन डेव्हिड लॅनजॉब मलेशिया, एस्थर मोहंका कार्यकारी संचालक, शो डायरेक्टर ओम सत्पती, मिस्टर पेडले पीटर सीईओ आयकॉनिक प्रोडक्शन्स मलेशिया आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 
     आपल्या या यशाबद्दल पाटिल म्हणाल्या, की मेहनत, सहनशक्ती आणि सातत्य यामुळेच हे यश मिळाले आहे. माझ्या यशाद्वारे इतरांना नवनिर्मिती करण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची आणि प्रेरणा देण्याची इच्छा आहे. महिला सक्षमीकरण यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. या विजयानंतर मोठी जबाबदारी माझ्यावर आली असंही पाटील म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...