राज ठाकरे यांचा अयोध्दा दौऱ्याला स्थगिती, पुढच्या आठवड्यात होणार गुढग्यावर शस्रक्रिया, अफवानां पूर्णविराम !
भिवंडी, दिं,२०, अरुण पाटील (कोपर) :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित झाला असून त्य बाबतची माहिती खुद्द राज ठाकरे यांनी ट्विट करुन दिली आहे. तब्येतीच्या कारणांमुळे हा दौरा स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. आता पुढच्या आठवडयात गुढग्यावर शस्रक्रिया होणार असल्याने विविध अफवानां पूर्ण विराम बसला आहे.
राज ठाकरे यांच्या पायावर पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. राज ठाकरेंना पायाचा त्रास जाणवत असल्यानेच त्यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला असून साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी राज ठाकरेंच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हा पासूनच राज ठाकरेंना पायाचा त्रास जाणवत होता.
दरम्यान, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा तुर्तास स्थगित केल्यानंतर उलट सुलट चर्चा रंगायला सुरूवात झाली. यावर बोलताना राज ठाकरे २२ मे रोजी पुण्यात सभा घेणार असून ते अयोध्या दौरा स्थगित केल्याबद्दल बोलतील. उलट सुलट चर्चा करण्याचं काहीच कारण नाही, असंही बाळा नांदगावकर म्हणाले.
No comments:
Post a Comment