अनं पैठणीचा खेळ रगंला !
मंडणगड, गणेश नवगरे :- पालवणी गोकुळवाडी येथे श्रीकृष्ण विकास मंडळ मुबंई व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विध्यमानाने कोरोना काळात मृत्यू पावलेले कै. भैरव महागावकर, कै. शंकर बुवा तांबडे, कै. पांडुरंग यादव, कै. निर्मला गणपत दिवेकर, कै. रखमाबाई काशिनाथ घोगरे यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. त्या नंतर बॉक्स क्रिकेट सामन्याचे रत्नागिरी कबड्डी असोसिएशनचे सदस्य श्री सचिन सकपाळ यांनी नारळ वाढऊन क्रिकेटची खेळाची सुरूवात करण्यात आली, या मधे प्रथम क्रमांक मंडणगड डिंग डॉंग संघाने पटकावला, द्वितीय क्रमांक श्रीकृष्ण क्रीडा मंडळ गोकुळवाडी अ संघाने पटकावला, तर तृतिय क्रमांक निघवनी या संघाने पटकावला या सर्व विजेत्या संघास आकर्षक चषक व पारीतोषिक देऊन मंडळातर्फे गौरवण्यात आले. दिनांक 15 मे रोजी गोकुळवाडी ने सत्यनारायण पुजेच आयोजन केले. या सत्यनारायण पुजे दरम्यान गवळी वाडीत महिलांनसाठी हळदिकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले, या कार्यक्रमाला गोसावीवाडी, मराठावाडी, ब्राम्हण वाडीतील महीला उपस्थित होत्या, हा कार्यक्रम मोठ्या ऊत्साहात पार पाडला गेला. या कार्यक्रमावेळीस महिलांनी आपली व्यथा मांडली की दोन वर्षे कोरोनामुळे एकामेकात आपण भेटलो नव्हतो, परंतु आज कोरोनाचे बंधन हटवल्यामुळे आज आपण एकीमेकीला श्रीकृष्णाच्या कृपेने भेटतोय आपण अशा प्रकारे मत मांडुन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते. संध्यकाळी नऊ वाजता गावातील महिलांना प्रादान्य देऊन पैठनीचा खेळ सुरू करण्यात आला यात चेंडू स्टपला मारणे, डोळ्यांना रुमाल बांधुन ग्लासात ग्लास कमी वेळात करणे, मेणबत्ती पेटवणे, मडकं फोडणे, अशाप्रकारे विवीध कार्यक्रम घेऊन तब्बल सहा जणी पैठणीच्या मानकरी ठरल्या, त्या सौ. सुनंदा नटे, सौ. श्रुती नटे, सौ. कविता चाचे, सौ. प्रतिभा शिर्के, सौ. दर्शना महागावकर, व सौ. प्रतीक्षा दिवेकर.
या वेळेस ऊद्योजक ;-श्री घोगरेसाहेब, वपो. निरीक्षक सौ. सुनयना नटे, सभापती सौ. स्नेहल ताई सकपाळ , श्री विनोद महाडीक साहेब, सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे, दिपक जावडेकर, मुबंई मनपा शाळेच्या मुख्यध्यापिका अंजली जोगी या उपस्थिती होत्या. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राकेश महागावकर यांनी केले, तसेच श्री राजू महागावकर यांनी मुख्य कार्यवाहक म्हणून काम पाहिले. या सर्व कार्यक्रमात श्री मधू शिर्के (अध्यक्ष) श्री मंगेश दिवेकर (सचिव) तसेच श्री संतोष दिवेकर (खजिनदार) यांनी भाग घेतला. गावातील थोर पुरूष, लहान मुलं, महीला या कार्यक्रमाला हजर राहून ऊत्तम रीत्या कार्यक्रम पार पाडला.
No comments:
Post a Comment