वसद येथील विटभट्टीवरील मजुरांच्या मुलांसोबत भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने मा. श्री सुनील धोंडे साहेब यांचा वाढदिवस साजरा !!
अंबरनाथ, बातमीदार : भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने मा. श्री सुनील धोंडे साहेब यांचा वसद येथील विटभट्टीत काम करणाऱ्या गरीब मजूरांच्या मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी लहान मुलांना केक व कुरकुरे आणि चाकलेट वाटत, माता भगिनींना साडी व केक वाटप करुन साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुंदर डागे व काशीनाथ भोईर आणखी राज डांगे, बाळासाहेब पवार हे मान्यवर उपस्थित होते. या वेळी सुंदर डागे यांनी आपले मत व्यक्त करताना सुनील धोंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गरीब मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करुन जनतेला एक नवी दिशा देण्याचे काम धोंडे साहेब यांनी दिले तसेच सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपन झाला.
No comments:
Post a Comment