Sunday, 15 May 2022

उमराठ कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळातर्फे ८७ वी श्री सत्यनारायणाची महापूजा विविध कार्यक्रमांनी संपन्न !

उमराठ कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळातर्फे ८७ वी श्री सत्यनारायणाची महापूजा विविध कार्यक्रमांनी संपन्न !


( निवोशी/गुहागर -  उदय दणदणे ) :

प्रतिवर्षीप्रमाणे उमराठ कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ (रजि.) तर्फे शनिवार दि. ७ मे २०२२ रोजी सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. वाडीतील सर्व मंडळी संघटीत होऊन एका विचाराने, एकोप्याने एकत्र राहिले पाहिजेत या उद्देशाने १९३५ साली त्यावेळेचे तरूण विचारवंत कार्यकर्ते भागोजी का. धनावडे, भिकू गो. गावणंग, धाकू गो. गावणंग, नारायण गु. गावणंग, हरी गं. गावणंग, सोनू ता. गावणंग इत्यादी मंडळींनी सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापूजा सुरू केली होती. ती आजतागायत अखंडित सुरू असून  नुकतेच सार्वजनिक पुजेचे ८७ वे वर्ष होते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 


गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाचे कडक निर्बंध असल्यामुळे मुंबईकर चाकरमानी न येता सार्वजनिक पुजा स्थानिक मंडळींच्या सहकार्याने साधेपणातच मांडण्यात आली होती. यावर्षी मात्र भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करून पुर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वा. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पुजन व प्रबोधन, दुपारी १२ वा.श्री सत्यनारायणाची महापूजा कथाकथन व तिर्थप्रसाद, दुपारी ३ वा. पंचक्रोशीतील महिलांसाठी हळदीकुंकू व वैद्यकीय मार्गदर्शन, रात्री ८ वा. शालेय विद्यार्थ्यांचे गुणगौरव व मान्यवरांचा सन्मान आणि करमणुकीसाठी रात्री १० वा. ग्रामस्थांचे  नमन अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती.

शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मान्यवरांचा सन्मान प्रसंगी वयोवृद्ध आणि कोंडवीवाडीच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या श्रीमती पार्वतीबाई भागोजी  धनावडे, श्रीमती लक्ष्मीबाई नारायण अशा आणखी ७/८ वयोवृद्ध महिलांचा व जेष्ठ कार्यकर्त्यांचा त्याचप्रमाणे सभागृहासमोरील जागा विनामूल्य दिल्याबद्दल श्रीमती गंगायबाई बाबाजी आंबेकर यांचा सर्वांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.  
तसेच जन्मजात मतिमंद व्याधी असलेला कु. अविनाश दत्ताराम गावणंग याला जवळजवळ २५ वर्षे संपूर्ण कुटुंब लहान मुलासारखे सांभाळत आहेत त्याचे सुद्धा आई-वडील व काका-काकी या संपूर्ण कुटुंबाचे आणि C.A. पदवी मिळवलेला कु. शुभम सखाराम धनावडे तसेच कोंडवीवाडीचे प्रमुख कार्यवाहक व तरूणांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक श्री सुरेश भिकू गावणंग यांचे सुद्धा सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते विशेष भेटवस्तू, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार / सन्मान करण्यात आला. 

या नमन कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग यशवंत नाट्य मंदिर मुबंई येथे २०२० साली सादर झालेला होता.आणि तेच नावाजलेले श्री नवलाई नमन मंडळ-उमराठ यांचे *" नमन” "सादरकर्ते" “कोंडवी" "वाडी उत्कर्ष मंडळ" श्री वैभव धनावडे दिग्दर्शित नाविन्यपूर्ण "गण-गवळण” आणि व्यसनाच्या आहारी जाऊ नका, गावाकडची जमीन विकू नका, गावाकडे चला असा संदेश देणारे *श्री. मंगेश गावणंग* लिखित विनोदी प्रबोधनपर फार्स “जाऊ कोकणच्या गावा” लोक मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे गायन-गीतकार व सूत्रधार श्री योगेश गावणंग यांनी केले. या कार्यक्रमातील सर्व कलाकार उच्चशिक्षित असून आपल्या कोकणच्या पारंपारिक लोककलेचा वारसा पुढे नेत नमन लोककला जतन करत आहेत.  

सदर सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजे निमित्त गुहागर नगरपरिषदचे नगराध्यक्ष- राजेशजी बेंडल, उमराठ गावचे सरपंच- श्री जनार्दनजी आंबेकर, रत्नागिरी जिल्हापरिषद सदस्या- सौ नेत्राताई ठाकूर, उमराठ गावाचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री संदीपजी गोरीवले, उमराठ खुर्दच्या पोलीस पाटील वासंतीताई आंबेकर, कुणबी समाजजोन्नती संघ, शाखा-गुहागर अध्यक्ष- श्री कृष्णाजी वणे, कुणबी समाजजोन्नती संघ, शाखा गुहागर-सचिव श्री अनंतजी मालप, शक्ती-तुरा प्रसिद्ध शाहीर श्री प्रकाश पाजणेसर, मृदूंग ढोलकीवादक  श्री विलास बुदर, ऑर्गनवादक श्री संदेश आंबेकर, आक्टोपॅडवादक श्री नितीन पवार, नृत्य दिग्दर्शक- श्री गणेश पुजारी सर, रंगभूषाकार गंगाराम गोताडसर, नमन लोककला संस्था संलग्न शाखा- ता. गुहागरचे अध्यक्ष - सुधाकर मास्कर सर, बळीवंश कलामंच रत्नागिरी अध्यक्ष सागर डावल सर, उमराठ प्रीमियर लीगचे अध्यक्ष- श्री शशिकांत पोस्कर, सहकारी महेश आंबेकर, पत्रकार- श्री सुरेश आंबेकर, उमराठ गावचे उपसरपंच-सूरज घाडे, उमराठ कोंडवीवाडी शाळा नं.३ चे सैतवडेकर सर, ग्रामपंचायत सदस्या कु. गुलाब ग. गावणंग तसेच गुहागर तालुक्यातील लोककला व सांस्कृतिक वारसा जपणारे अनेक नामवंत मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचा कोंडवीवाडी उत्कर्ष मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन व आभार प्रदर्शन श्री. मनोज ग. गावणंग व श्री. राजेश स. गावणंग यांनी उत्कृष्टपणे केले तर या कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे प्रमुख कार्यवाहक श्री.सुरेश भिकू गावणंग, स्थानिक अध्यक्ष श्री. भिकू लक्ष्मण मालप आणि वाडीतील इतर सहकारी यांचे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...