डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांकडून मुंबईत महास्वच्छता अभियान !!
"पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीसदस्यांचा सामाजिक उपक्रम"
घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :
पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज दि. १५ मे रोजी मुंबई विभागात डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या श्रीसदस्यांकडून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
मुंबई विभागात एफ नॉर्थ, एल वार्ड, एम इस्ट, एम वेस्ट, एन वार्ड आदी विभागात हे स्वच्छता अभियान घेण्यात आले. यात १ एसटी डेपो, २ गार्डन, १७ पोलीस ठाणे, ३ बस डेपो, ९ सरकारी रुग्णालये, १४ हिंदू स्मशानभूमी, कबरस्तान, ख्रिश्चन स्मशानभूमी अशा स्थळांची श्रीसदस्याकडून स्वच्छता करण्यात आली. या महास्वच्छता अभियानात हजारोहून अधिक श्रीसदस्य उपस्थित होते. यावेळी २६,३०९ किलो सुका कचरा आणि ८१३ ओला कचरा श्रीसदस्याकडून जमा करण्यात आला.
(प्रतिक्रिया) :
-----------------
संजय सोनवणे ( सहायक आयुक्त मनपा- एन वॉर्ड ) : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य नेहमीच कौतुकास्पद राहिले आहे. वेळेत आणि शांततेत हे कार्य पार पडते हे खरोखरच देशासाठी आदर्शवत आहे. श्रीसदस्याच्या या सामाजिक कार्यामुळे इतरांना देखील प्रेरणा मिळते आहे. राजावाडी रुग्णालय, मुक्ताबाई रुग्णालय, पोलीस ठाणे येथील स्वच्छता आम्ही पाहिली इतकी सुंदर स्वच्छता ही मनात असलेल्या देशप्रेमातूनच होऊ शकते.
संजय डहाके ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, घाटकोपर ) : स्वच्छता मोहिमेत श्रीसदस्यानी मिळेल ते काम अगदी चोख पार पाडले आहे. या आधीही अनेकदा श्रीसदस्यानी येथे स्वच्छता मोहीम घेतली होती. पहाटे सकाळी लवकर उठून वेळेत कार्य पार पडणे हे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांनी त्यांच्या आध्यात्मतून दिलेली शिकवण आहे.
No comments:
Post a Comment