Sunday, 15 May 2022

भिवंडीत जमीन संपादनात घोटाळा; नायब तहसीलदार फरार...

भिवंडीत जमीन संपादनात घोटाळा; नायब तहसीलदार फरार...

भिवंडी, अरुण पाटील - मुंबई-वडोदरा कॉरीडोर मार्गात भूसंपादन झालेल्या भिवंडी तालुक्यातील नंदीठणे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रुपयांचा शासकीय मोबदला बनावट शेतकरी उभे करून लाटणाऱ्या गुन्ह्यात आतापर्यंत १७ जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. 

मुंबई-बडोदा महामार्गात भिवंडी तालुक्यातील नंदिठणे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबदला राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये अदा करण्यात आली आहे. यापैकीच आठ शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीचे नायब तहसीलदार आणि त्याच्या मैत्रिणीने डाव रचून बनावट कागदपत्रे तयार केली होती. शासनाकडून मूळ शेतकऱ्यांना मिळालेली ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रूपयांची रक्कम परस्पर काढून घेऊन शेतकऱ्यांबरोबर, शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी नायब तहसीलदाराच्या मैत्रिणीसह १७ आरोपींना अटक केली असून, घोटाळ्यातील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी फरार झाला आहे. 
गोसावींच्या नावामुळे प्रांत कार्यालयातील आणखीही अधिकारी व कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आले असल्याने प्रांत कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी या गुन्ह्यात पंधरा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांनतर तपासात साखराबाई उर्फ अनिता बाळासाहेब वाघमारे व संतोष दत्तात्रय मोरे या दोघांना पोलोसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात नायब तहसीलदार गोसावी यांचे नाव समोर आल्याने या प्रकरणात प्रांत कार्यालयातील आणखीही अधिकारी व कर्मचारी अडकण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...