Tuesday, 24 May 2022

निओने आणले भडे वासियांच्या चेहऱ्यावर आनंद !! "15 पथदिव्यानी उजळले भडे, निओ फाउंडेशनचा पुढाकार"

निओने आणले भडे वासियांच्या चेहऱ्यावर आनंद !!

"15 पथदिव्यानी उजळले भडे, निओ फाउंडेशनचा पुढाकार"


लांजा, (शांताराम गुडेकर /दीपक मांडवकर) :
        जर तुम्ही कोणासाठी दिवा लावलात तर तो तुमचा मार्गही उजळून निघेल या ध्येयवाक्याने प्रेरीत होऊन व्हिलेज सोलर स्ट्रीट लायटनिंग साठी कार्य करणाऱ्या निओ स्माईल फाउंडेशनने तालुक्यातील भडे गावात रात्रीचा संचार सुखावह केला आहे. 


       अत्यंत ग्रामीण भागात मुंबई येथील निओ स्माईल या सामाजिक संस्थेने विविध ठिकाणी लावलेल्या सोलर स्ट्रीट लाईट मुळे भडे गाव उजळून निघाले आहे. डोंगराळ भागात वसलेल्या या गावात सदर पुढाकारामुळे वाडीवस्ती, शाळा, मंदिरे, दवाखाना, स्मशानभूमी आदि ठिकाणी रात्रीचे फिरणे गावकऱ्यासाठी अत्यंत सुलभ आणि सुखावह झाले आहे. त्यामुळे गावकरी यांनी निओ स्माईल संस्थाप्रमुख दीनानाथ तिवारी, ऑपरेशन प्रमुख तन्मय मुखर्जी, संभाषण आदिती, मीडिया टीम तपस्या आणि करण, सरपंच सुधीर तेंडुलकर, अनुसया संस्थेच्या निलम पालव  यांना विशेष धन्यवाद दिले आहेत. 


       दरम्यान व्हिलेज सोलर स्ट्रीट लाईट च्या उदघाट्न प्रसंगी भडे ग्राम सेवा संघ मुंबई अध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी अध्यक्ष दत्ताराम राऊत यांनी निओ स्माईल परिवाराने भडे गावातील रात्रीचा भयाण अंधार दूर केल्याने त्यांना विशेष धन्यवाद दिले. निओ स्माईल ने केलेल्या सहकार्याबद्दल भडे ग्रामस्थांकडून ऋण व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment

कोकण मराठी साहित्य परिषदच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी शीतल करदेकर यांची नियुक्ती !

कोकण मराठी साहित्य परिषदच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी शीतल करदेकर यांची नियुक्ती ! मुंबई (शांताराम गुडेकर) :           कोकण मराठी...