Wednesday, 25 May 2022

राज्यातील गटविकास अधिका-यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी पदोन्नती, विक्रमगडचे बीडिओ मुरबाडला ?

राज्यातील गटविकास अधिका-यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी पदोन्नती, विक्रमगडचे बीडिओ मुरबाडला ?


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील गटविकास अधिकारी या संवर्गातील सुमारे ७२ गटविकास अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांना उपमुख्य कार्यकारी पदी पदोन्नती देण्यात आली आहे, विक्रमगड जिल्हा पालघर येथील गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांची मुरबाड पंचायत समितीच्या बीडिओ म्हणून बदली झाली आहे. येथील रिक्त पदी त्यांची नियुक्ती झाली आहे.


राज्यातील सुमारे ७२ गटविकास अधिकारी अर्थात महाराष्ट्र विकास सेवा गट 'अ' या संवर्गातील अधिका-यांना तात्पुरती उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदी पदोन्नती देण्यात आल्या आहेत. यामध्ये यवतमाळ, वाशिम, कोल्हापूर, रायगड, पुणे, सातारा, जळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, अकोला, उस्मानाबाद, वर्धा, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धुळे, सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, अहमदनगर, नाशिक, पालघर, नागपूर, बुलढाणा, अमरावती, नवी मुंबई, आदी जिल्हा, तालुक्यातील हे गटविकास अधिकारी असून सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नतीने नियुक्तीसाठी विहित केलेल्या महाराष्ट्र शासकीय गट 'अ' व गट 'ब' पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम २०२१ मधील तरतुदीच्या अधीन नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी तसेच सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेने या पदोन्नती देण्यात आल्या आहेत.


यातील विक्रमगड तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांची मुरबाड जिल्हा ठाणे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी या रिक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती पालवे यांनी या अगोदर कल्याण पंचायत समितीच्या बीडिओ पदाची धुरा सांभाळली होती, कोरोनाच्या अत्यंत संकटकाळी त्यांनी कल्याण तालुक्यात काम केले होते, त्यांच्याच कार्यकाळात वरप येथे कोव्हिड केअर सेंटर सुरू झाले होते. आता मुरबाड तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत विविध पाणी पुरवठा योजना, दुरुस्ती, पेसा क्षेत्रातील विविध विकास कामे, आणि कार्यालयातील दप्तर दिरंगाई आदी समस्या व अडचणी कशा दूर करतात हे येणाऱ्या काळात कळेल.

No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...