मैत्रकूलच्या पाचव्या वर्धापनदिनी कल्याण येथे " संकल्प मेळावा" साजरा होणार !!
कल्याण, संदीप शेंडगे : बापगाव येथे असलेल्या कल्याण जवळील मैत्रकूलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त संकल्प मेळाव्याचे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या मेळाव्याचे आयोजन रविवार २९ मे रोजी केले असल्याची माहिती श्रेया निकाळजे यांनी दिली आहे.
वस्तीतील गोर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घ्यावे यासाठी कायम धडपडणारे आणि आपल्या खांद्याला झोळी लावून त्यात झोळीत फळा, खडू, पुस्तके आणि खेळणी घेऊन फिरणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोरदादा जगताप यांनी मुंबई, ठाणे आणि पालघर येथे अनेक बागशाळा, वस्तीशाळा चालवल्या पण कालांतराने लक्षात आले की विद्यार्थ्यांना पूर्णवेळ मार्गदर्शनाची गरज आहे, ही गरज ओळखून त्यांनी १० मे २०१७ रोजी विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी गुरुकुल पध्दतीने मैत्रकूल सुरू केले. मैत्रकूल बघता बघता ०५ वर्षाचे झाले. मैत्रकूल "जीवन विकास केंद्र" ही अत्यंत आगळी वेगळी संकल्पना. "किशोर जगताप" यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या मैत्रकूलने असंख्य गोरगरीब, होतकरू, ध्येयवादी विद्यार्थ्यांना एका अर्थाने विद्येच्या, मायेच्या, माणुसकीच्या सावलीखाली मोठं केलं आहे आणि करत आहे करत राहतील. या सर्व कार्यात त्यांची सक्रिय साथ दिली ते छात्रशक्ती संस्थेच्या अध्यक्षा राजप्रिया बडेकर यांनी.
एकेकाळी एक टोप, वाटी, चमचा, ताट घेऊन कल्याण मधील बापगाव येथील गायकर कंपाऊंड मध्ये ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली. आधी १५ मग ३० नंतर ५६ विद्यार्थी आणि बघता बघता कल्याण, पुणे, रायगड, सातारा, अश्या विविध ठिकाणी मैत्रकूल च्या शाखा उभा राहिल्या. सामाजिक भान असलेल्या, माणुसकी जपणाऱ्या अनेक लोकांनी आपली जागा काही वर्षाच्या करारावर देऊन इथे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे यासाठी सहकार्य केले अशी माहिती मैत्रकूल प्रमुख संचालक आशिष गायकवाड यांनी दिली.
येत्या २९ मे २०२२ ला *संकल्प मेळावा २०२२* चे आयोजन मैत्रकूल जीवन विकास केंद्र कल्याण पश्चिम येथे करण्यात आले आहे. ज्यात मैत्रकूल च्या पुढील कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. ह्या मेळाव्यात विविध मान्यवरांना *मैत्रकूल दूत* ह्या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. त्यानिमित्ताने आपणा सर्वांना आग्रहाचे व हक्काचे आमंत्रण मैत्रकूल नवनीत शाखा प्रमुख पूजा जया गणाई यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात माहिती दिली.
No comments:
Post a Comment