Wednesday, 4 May 2022

माहीम, मुंब्रा, भिवंडी, कल्याण, पनवेल, पंढरपूर, मनमाड, नासिक, या ठिकाणी भोंग्याविना अजान हनुमान चालीसा "न" लावत मनसेने मानले आभार !!

माहीम, मुंब्रा, भिवंडी, कल्याण, पनवेल, पंढरपूर, मनमाड, नासिक, या ठिकाणी भोंग्याविना अजान हनुमान चालीसा "न" लावत मनसेने मानले आभार !!


भिवंडी, दिं,४, अरुण पाटील (कोपर) :
        मशिदीवरील अनाधिकृत भोंगे हटवावेत, सुप्रीम कोर्टाचे आदेशाचं पालन करावं अन्यथा जिथे भोंगे लावतील तिथे दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावू अशा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आमचा अजानला विरोध नाही असेही  मनसेने या पूर्वीच स्पष्ट केले होते.
         यावर मुस्लिम बांधवानी देखील सामाजिक भान राखत मुंबईतील माहीम, ठाण्यातील मुंब्रा, भिवंडी, कल्याण, पनवेल, पंढरपूर, मनमाड, नासिक या ठिकाणी भोंग्या "विना" अजाण देण्यात आली तर नासिक मध्ये काही भागात भोंग्याविना अजाण देण्यात आली आहे. त्या वेळी हनुमान चालीसा "न "लावत मनसेने देखील आभार मानले आहे. ४ मे रोजी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावण्यासाठी तयारीही केली होती. राज्यातील काही भागात हनुमान चालीसा लावण्यातहि आली होती.
           मनसेच्या इशाऱ्यानंतर राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मुंबईत १५ हजार मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली. मात्र भोंगे हटवा नाहीतर हनुमान चालीसा वाजवू या भूमिकेवर मनसे ठाम होती.
            सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत बऱ्याच ठिकाणी भोंग्याविना अजान झाली. मनसे कार्यकर्ते गनिमी काव्याने हनुमान चालीसा लावणार होते. मात्र भोंग्याविना अजान झाल्याने मनसे कार्यकर्त्यांनीही राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन केले. वांद्रे येथील जामा मशीद, मुंब्रा येथील दारुफाला मशिदीतही बांग देण्यात आली नाही.
             मुस्लीम बांधवांनी सामाजिक भान राखत भोंग्यावरून अजान म्हटली नाही. मनसेचा अजानला विरोध नाही. बऱ्याच ठिकाणी भोंग्यावरून अजान दिली नाही. माहिम, मुंब्रा, पनवेल, भिवंडीच्या पडघा इथं भोंग्याविना अजान झाली. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली नाही. महाविकास आघाडी सरकारनं जो खोटा प्रचार केला त्याला मुस्लीम बांधवांनी खोटे पाडलं आहे.
             अजान भोंग्यावरून न झाल्यानं अनेक ठिकाणी हनुमान चालीसा वाजवण्यात आली नाही असं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपली, भोंगे "न" लावता अजान पठण केले. त्याबद्दल त्यांचे आभार आहे. मनसे आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारने केले. मात्र मुस्लीम बांधवांनी त्याला चपराक दिली आहे असं मनसे नेते संतोष धुरी यांनी सांगितले.                                                              सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी, असं आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले होते.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...