Sunday, 22 May 2022

विजयकुमार यांनी परवाना रद्द झाल्यावर परिवहन विभागावर केले आरोप ; पण परिवहन विभागाने दिले कारण !!

विजयकुमार यांनी परवाना रद्द झाल्यावर परिवहन विभागावर केले आरोप ; परिवहन विभागाने दिले स्पष्टीकरण !!


ठाणे, बातमीदार : परिवहन विभागाकडून मीरा रोड येथिल विजयकुमार वोरा या अपंग व्यक्तीचा लाच दिली नाही म्हणून रिक्षा परवाना रद्द केला असल्याचे विजयकुमार सांगतात. मीरारोड येथे राहणाऱ्या विजयकुमार वोरा यांनी राज्य सरकारकडून अपंग असल्याचे दाखले मिळवले. अपंग असल्यानंतर कोणती वाहने चालवता येऊ शकतात आणि कशाप्रकारे ती चालवावी, याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देखील मिळवले. त्यानंतर परिवहन विभागातमध्ये रिक्षाचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज देखील केला. चार वेळा चाचणी दिली. सर्व खटाटोप करुनही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून विजयकुमारला 50 हजाराची लाच मागितली. लाच देण्यासाठी पैसे नसल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अस आरोप विजयकुमार यांनी केला.

विजयकुमार यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी परिवहन विभागाकडे याबाबत तक्रार दिली आहे. आता त्यांच्या तक्रारीची सुनावणी परिवहन आयुक्तांकडे होणार असून त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा विजयकुमार व्यक्त करत आहे. 

प्रतिक्रिया :- विजय कुमार यांना परिवहन विभागाकडून चुकीने परवाना मिळाला आहे. विजय कुमार यांनी रिक्षा चालवणे सुरू केल्यावर एखादा अपघात झाल्यास त्यांना आवश्यक ती मदत पोहोचवणे किंवा मदत मिळवण्यासाठी अडचण येऊ शकते. मोटार वाहन कायदामध्ये रिक्षाचालकांच्या आवश्यक असलेल्या सेवा ते देऊ शकत नाही, म्हणून हा परवाना रद्द केला. - परिवहन अधिकारी शेळके 

No comments:

Post a Comment

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात !

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात ! ** श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आंगवलीतर्...