Saturday, 25 June 2022

राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १० जुलै पर्यंत संचारबंदी !

राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १० जुलै पर्यंत संचारबंदी !


मुंबई, बातमीदार : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्याच्या अनेक भागात शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर निषेध रॅली काढून त्यांच्या होर्डिंगला काळे फासले. काही ठिकाणी कार्यालयांची तोडफोडही करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार राज्यात परतल्यानंतर बंडखोरांच्या संघर्षात वाढ होण्याची शक्यता आहे. 

याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस अलर्ट झाले असून, मुंबईत आजपासून १० जुलैपर्यंत संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सुरक्षा दिली जाणार आहे. सोशल मीडियावर पोलिसांचे विशेष टीम लक्ष ठेवणार आहे. हिंसक बॅंनर, पोस्टर तात्काळ काढण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. राज्यात सध्या राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार हे आदेश जारी केले आहे. त्याचबरोबर सर्व पक्षांना आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...