Sunday, 26 June 2022

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची जिल्हा आढावा सभा कल्याण पंचायत समिती मध्ये !

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची जिल्हा आढावा सभा कल्याण पंचायत समिती मध्ये !


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 ची ठाणे जिल्हा आढावा सभा  विकास भोईर कोकण विभाग अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली कल्याण पंचायत समिती सभागृह येथे नुकतीच आयोजित केली होती. 


त्यावेळी व्यासपीठावर माझी आमदार श्री नरेंद्र पवार साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या, कर्मचाऱ्यांच्या सेवा जेष्ठता, रिक्त पदे, वेतनश्रेणी आदी बाबतीत चर्चा करून केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्याशी विचारविनिमय करून अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले तसेच मुंबई व दिल्ली येथे प्रशासकीय बैठक लावण्याचेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले.


याप्रसंगी कोकण विभाग कार्याध्यक्ष  दत्तात्रय भोईर, जिल्हा अध्यक्ष अजय जाधव, उपाध्यक्ष  कबीर भोईर, सचिव  अजय चोरघे, कार्याध्यक्ष  प्रकाश जाधव, महिला आघाडी अध्यक्ष सौ अक्षता खेडेकर, सहसचिव के पी पाटील, कल्याण तालुका अध्यक्ष सुरेश गायकर, मुरबाड तालुका अध्यक्ष देविदास खाटेघरे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...