Thursday, 2 June 2022

म्हारळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व मारण्याची धमकी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ?

म्हारळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व मारण्याची धमकी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दोन नागरिकांनी कार्यालयात येवून किरकोळ कारणावरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन अंगावर धावून जाऊन मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच घडला असून या विरोधात सर्व ग्रामपंचायत कर्मचारी एकत्र येऊन कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे अश्या प्रकारामुळे कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या विरोधात कर्मचाऱ्यांनी म्हारळ ग्रामपंचायत कार्यालय काही काळ बंद ठेवले आहे.


सर्वाधिक लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत म्हणून म्हारळ ग्रामपंचायत ओळखली जाते. १७ सदस्य, ६ वार्ड आणि सुमारे ६० कर्मचारी असा पसारा असलेल्या या ग्रामपंचायतीची क्षमता सोईसुविधा पुरविताना जवळपास संपुष्टात येते, तरीही कसेबसे का होईना नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व कर्मचारी सतत प्रयत्न करत असतात. याचाच एक भाग म्हणून वार्ड क्रमांक ३ मध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी जागोजागी वाँल बसविण्यासाठी ग्रामपंचायतीने खड्डे खोदले आहेत,


याच एमआयडीसी रोड परिसरात राहणारे जितेश सिंग हा याचा जाब विचारण्यासाठी म्हारळ ग्रामपंचायत कार्यालयात गेला व कर्मचाऱ्यांना अरेरावी च्या भाषेत बोलू लागला, यावर ग्रामपंचायत कर्मचारी गोटूराम रमाकांत देशमुख यांनी हे नवीन पाण्याचे काम आहे, तूम्हाला काही अडचण असेल तर तूम्ही सरपंच मँडम यांना सांगा अशी विंनती केली, तसेच दुसरे लिपिक अशोक सिताबाई परमार यांनी ही समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु बाचाबाची वाढत गेल्याने जितेंद्र सिंग यांनी त्याचा भाऊ गितेश सिंग याला व त्याच्या बरोबर इतर सहकारी बोलावून देशमुख व परमार यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून अंगावर धावून जावून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लगोलग पोलीस ठाणे गाठून या दोघा विरोधात तक्रार दाखल केली.

तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन अश्या दादागिरी विरोधात आवाज उठवला असून ग्रामपंचायत कर्मचा-यानी कार्यालय बंद ठेवले असून सरपंच प्रगती कोंगिरे यांच्या घरी कार्यालयाच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न गंभीर वळणावर जाणार असे वाटते.

तसेच म्हारळगाव हे गुन्हेगाराचे माहेरघर बनत चालल्याने वसूली व इतर ग्रामपंचायत ची कामे करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजय जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, संघटना कर्मचाऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी असून आरोपी च्या मागे राजकीय पाठबळ असते. तरीही आम्ही कायदेशीर लढा देणार, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...