Friday, 3 June 2022

वस्तूनिष्ठ व परिस्थितीजन्य पत्रकारितेचा परिणाम, खचलेला रस्ता दुरुस्त, अनेकांचे वाचले जीव, निर्भीड बातमीदारीचा गौरव !

वस्तूनिष्ठ व परिस्थितीजन्य पत्रकारितेचा परिणाम, खचलेला रस्ता दुरुस्त, अनेकांचे वाचले जीव, निर्भीड बातमीदारीचा गौरव !


कल्याण, (प्रतिनिधी) : दररोज गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत चे लोकप्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी, शेकडो समाजसेवक, लोकसेवक आदी विविध प्रकारचे लोक कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावरुन सतत येजा करीत असताना ही रायते गोवेली या दोन गावाच्या दरम्यान खचलेला रस्ता कोणाच्या ही नजरेस आला नाही, परंतु या भागातील पत्रकार संजय कांबळे यांनी हा प्रकार उजेडात आणताच याची दखल घेऊन दोनच दिवसात संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बूजविण्यात आल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या अनेकांचे प्राण वाचले आहे, त्यामुळे तालुक्यातील अनेकांनी या वस्तूनिष्ठ व परिस्थितीजन्य पत्रकारीतेचा गौरव केला व आभार मानले.

                                (दुरूस्त केलेला रस्ता)

कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्गावर गोवेली रायते या दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्ता खचला होता, येथे अनेक वेळा अपघात झाले आहेत, परंतु काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारी अंनता तांबोळी यांचा येथे भयानक अपघात झाला, या खड्यात बाईक स्लिप झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते.हा अपघात जीवावर बेतणारा होता, ते कित्येक दिवस रुग्णालयात उपचार घेत होते, सुदैवाने यातून ते वाचले,

                                        (आधीचा रस्ता)
या रस्त्यावर वरुन मंत्री, खासदार, आमदार, विविध पक्षाचे अध्यक्ष, अगदी गल्ली बोळातील तथाकथित नेते, समाजसेवक, लोकसेवक, अधिकारी, कर्मचारी, सतत ये जा करत होते, परंतु कोणीही या बद्दल चकार शब्द काढला नाही, किंवा प्रशासनाला जाब विचार ला नाही, अगदी किरकोळ विषयावरुन मोर्चे, अंदोलन,उपोषण करणारे ,बँनरबाजी करणारे त्यांना हा प्रकार दिसला नाही, हे विशेष ?

परंतु तालुक्यातील पत्रकार संजय कांबळे यांनी हा प्रकार विविध दैनिकाच्या माध्यमातून सर्वासमोर आणला तो इतका पसरला की नँशनल हायवे अँथोरटी खडबडून जागे झाले व दोनच दिवसात संपूर्ण रस्त्यावर खड्डे, चिरा भरण्यात आल्या 

तसे पाहिले तर हा महामार्ग नँशनल हायवे अँथोरटी कडे असल्याने त्यांच्या पर्यंत पोहचने अवघड, त्यात ते गेड्यांच्या कातडीचे ? अशातच प्रत्येकाचा वेळ काडू पणा ? यामुळे याकडे कोणी लक्ष देत नव्हते, परंतु बातमी प्रसिद्ध होतात, नेहमीप्रमाणे विविध वँटसँफ ग्रुपवर या विरोधात अंदोलन करण्याच्या रसभरीत'चर्चा, रंगल्या, यापलीकडे काही झाले नाही, पण बातमी चा इतका जबरदस्त "दणका" बसला की रस्त्यावरील खड्डे गायब झाले, या परिणाम कारक व वस्तूनिष्ठ पत्रकारीतेबद्ल अगदी वरीष्ठ अधिका-यापासून ते कर्मचारी, जनता, जागृत नागरिक, शेतकरी, विविध मंडळाचे अध्यक्ष, आदी नी या बातमीदारीचे कौतुक केलं. तसेच भविष्यात अनेकांचे जीव वाचविले त्याबद्दल आभार ही मानले.

यामध्ये जिल्हाधिकारी, कातकरी समन्वय समितीचे अध्यक्ष हरेश वाघे, शहापूर तालुक्यातील किशोर पंडित, भिवंडी चे पंढरी पाटील, पेणचे अंकल वढावकर, कल्याण चे जनार्दन कोर, मुरबाड चे दिनेश कराले, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सुरेश गायकर, शेतकरी, वंसत शिसवे, भातसई चे सुरेश गायकर, चालक राहूल मोरे, जेष्ठ नागरिक, वाळकू भोईर, कामगार, सोपान भोईर, मंडळाचे अध्यक्ष कैलाश गायकर, गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी, श्री डोंगरे, अँड सुनील गायकर, अँड मनोज सुरोशे, कल्याण महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी, आदी शेकडोंचा समावेश असून केवळ प्रातिनिधिक स्वरूपात हा नामोल्लेख करण्यात आला आहे. यातील अनेकांनी आपण या ठिकाणी कसे वाचलो हेही अनुभव सांगितले.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...