मुरबाड नगरपंचयतीच्या तुंबणाऱ्या गटारावर उपाययोजना नसल्याने बाजार पेठेतील व्यापाऱ्यांचे स्थलांतर !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) :- शहरातील हनुमान मंदिर ते पै चे हाॅटेल दरम्यान असणाऱ्या बाजार पेठेत तुंबणाऱ्या गटाराचे पाणी काढण्यात उपाययोजना करण्यात नगरपंचयत अपयशी ठरल्याने ते गटाराचे पाणी दुकानात शिरत असल्याने लाखोंचे नुकसान टाळण्यासाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय तेलवणे यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऐतिहासिक बाजारपेठेतुन पळ काढल्याने नगरपंचयतीच्या कारभारावर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मुरबाड ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले आणि खऱ्या अर्थाने विकासाला सुरूवात झाली व संपूर्ण मुरबाड शहराचा कायापालट करण्यात नगरपंचयत यशस्वी ठरली असली तरी हनुमान मंदिर ते पै. चे हाॅटेल दरम्यान असणारी पारिपांरिक बाजार पेठेत तुंबणाऱ्या गटारावर लाखो रुपये खर्च केले असले तरी पावसाळ्यात पुरपरिस्थित तुंबणाऱ्या गटाराचे पाणी थेट व्यापाऱ्यांचे दुकानात शिरत असल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते.
यावर नगरपंचायत उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याने हे नुकसान टाळण्यासाठी तालुक्यातील शेतकरी, शालेय विद्यार्थी, महिलांसाठी गृहपयोगी वस्तु. या किराणा माल, शेतीची औजारे व आयुर्वेदिक औषधे मिळण्याचे एकमेव ठिकाण असलेल्या या बाजार पेठेतील गटाराचे पाणी तुंबते असल्याने गुडघाभर वाहणाऱ्या या गटारात ग्राहक येण्याचे टाळतात. शिवाय हे पाणी दुकानात शिरत असल्याने फायद्या पेक्षा नुकसान जास्त होत असल्याने या प्रमुख आणि उपयुक्त अशा बाजार पेठेतुन व्यापारी स्थलांतरित होत असल्याने तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाचे स्थलांतरामुळे शिवाजी चौकातील नेहमी गजबजलेली बाजारपेठ ही नागरिकामुळे ओस पडली असल्याने हनुमान मंदीरासमोरील बाजारपेठ देखील बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने नगरपंचयतीच्या कारभारावर सर्वत्र नाराजी पसरली आहे.
****नगरपंचायतीच्या नियोजनाचे अभावामुळे व दर्जा हिन कामामुळे गटारातील पाण्याचा निचरा होत नाही.ते पाणी दुकानात तसेच पाठीमागे असणाऱ्या घरात घुसते त्यामुळे लाखोंचे नुकसान टाळण्यासाठी व्यापारी स्थलांतरित होत आहेत.भविष्यात आम्हाला बेघर होण्याची वेळ येईल.-- हरेश पुरोहित. व्यापारी.
-- हनुमान मंदीरासमोरील गटार रुंदीकरण करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही त्याला पर्यायी उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. परितोष कंकाळ -- मुख्याधिकारी, मुरबाड नगर पंचायत.



No comments:
Post a Comment