मातोश्री आमच्यासाठी मंदिर आहे - शिवसेना विभाग प्रमुख सुदाम भोईर
"कल्याण तालुका पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी, गद्दारांना जागा दाखवणार ?
कल्याण, (संजय कांबळे) : मातोश्री आमच्यासाठी मंदिर आहे आणि यामंदिरातील 'ठाकरें,कुंटूबिय आम्हा शिवसेनिकांचे दैवतं आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना कोणी दु:ख देत असेल, त्यांच्यावर चिखलफेक करत असेल तर ते कोणत्याही कट्टर शिवसैनिकांना मान्य होणार नाही. त्यांमुळे गेले ते' डोमकावळे, होते असे मानून आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असे सांगून भविष्यात या 'गद्दारांना,त्यांची जागा दाखवणार अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया शिवसेना विभाग प्रमुख सुदाम भोईर यांनी दिली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय भुंकप झाला, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरें यांचे अंत्यत जवळचे समजले जाणारे नगरविकास मंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून अनेक आमदारांना घेऊन सुरतमार्गे गुवाहाटी येथे पलायन केले. या घटनेमुळे सगळे अवाक राहिले, काय होतय ते कोणाला कळेना, दिवसेंदिवस शिवसेनेचे आमदार गुवाहाटी कडे वळू लागले, शिवसैनिकांनसह सगळ्याचीच संभ्रमवस्था निर्माण झाली.
यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी फुटून गेलेल्या बंडखोरांना परत या, आपण समोरासमोर बसून परिस्थिती वर पर्याय काढू, ज्यांनी मातोश्रीवर घाणेरडे आरोप केले, त्यांच्या सोबत जाऊ नका, असे अवाहन केले, सगळ्यांना इडिची 'पिडा' लावणारे भाजप हे करत आहे, असे वारंवार ते सांगत होते, तूमच्या साठी मी वर्षा हे शासकीय बंगला सोडायला तयार आहे, असे विधान करून तो सोडलाही पण तरीही बंडखोर ऐकायला तयार नाहीत. म्हटल्यावर पाण्यात तंरगती विष्ठा असे खडसावून शिवसैनिकांच्या जीवावर मी पुन्हा शिवसेना उभी करीन असे आव्हान एकनाथ शिंदे यांना दिले. यांनतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांना 'गद्दार, म्हणून अंदोलन पेटले, अनेक आमदारांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली, संपूर्ण ठाणे जिल्हा हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरें, यांच्या पाठिंशी असल्याचे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी जाहीर केले. तर आपण कट्टर शिवसैनिक आहे, आम्ही शिवसेना सोबत पक्षप्रमुखाबरोबरच आहोत असे सांगितले
तर सध्या कोण कोणाचा समर्थक अशी चर्चा सुरू असताना विभाग प्रमुख सुदाम भोईर यांची प्रतिक्रिया गद्दाराच्या डोळ्यात अंजन घालणारी अशीच आहे, ते म्हणाले, मातोश्री आमच्या साठी मंदिर आहे, यावर अनेकांनी घाव घातले, पण हिंदु हदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्या हद् यात आहेत, ते असते तर त्यांनी बंडखोरांना कधीच सोडले नसते पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसे नाहीत, ते शांत संयमी विचार करणारे आहेत, याचा गैरफायदा यांनी घेतला, आमच्या जिवावर निवडून यायचे व तूम्ही तूमच्या स्वार्थापोटी इकडे तिकडे बेडूक उड्या मारायच्या, हे चालणार नाही व पटणार ही नाही, आमच्या निष्ठा फक्त मातोश्री व ठाकरें कुंटूबियाशी आहेत, तूम्ही गेलात काय? किंवा राहिलात काय? याचे आम्हाला काहीही सोयरसुतक नाही, भविष्यात तुम्हाला तूमची जागा दाखवणार हे शिवसैनिकांचे वचनं आहे.




No comments:
Post a Comment