Saturday, 25 June 2022

महाराष्ट्रातील राजकीय बंडखोरीचे मूळ व खूळ :

महाराष्ट्रातील राजकीय बंडखोरीचे मूळ व खूळ :

विधान परिषद निवडणूक अटोपल्यावर शिवसेनेचे सुरुवातीला 12 आमदार नगरविकास मंत्री एकनाथ शिदे गुजरात मध्ये सुरत ला निघून गेले. नंतर हा बंडखोरांचा ग्रुप 40 आमदारांचा कसा झाला ? एक समीक्षण.. 


१)निवडणूक वर्षावर आली आहे ते निवडून येतील अशी खात्री काहींना अजिबात नाही जनतेच्या नाराजीचा फटका बसू शकतो हा एक अंदाज ! ना उद्धव ठाकरे यांची भूमिका साधी सरळ प्रामाणिक पणाची आहे किंवा आक्रमकतेची पण नाही. 

२) त्यांनी हिंदुत्वाचा नवा अर्थ महाराष्ट्राला सांगितला तो अर्थ भारतीय जनता पार्टीला पूरक नाही.

३) ज्यांना केवळ सत्ता हवी; पक्ष तत्वज्ञान धेय्य धोरण याच्याशी काही घेणे देणे नाही असे लोक भाजपला महाराष्ट्रात चालवत आहेत, कोणत्याही मार्गाने सत्ता हस्तगत हेच ध्येय...


३) अल्पशिक्षित, अल्प रोजगार व बेरोजगार यांची बौद्धिक क्षमतेचा अभ्यास करता त्यांना भावनिक मुद्द्यावर भडकवणे व मते घेणे निवडून येऊ शकतो ही अजूनही काहींना खात्री वाटते.

४) कामे करू निवडून येऊ यावर ज्यांचा विश्वास नाही दुसरी कडे सत्तेवर मंत्री असले तरी त्यातील आर्थिक माहिती भाजप ला मिळत राहते आणि भाजप केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून ईडी /सीबीआय वापरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म. वी. आ. मंत्र्यांना केव्हा टारगेट करेल? याचा नेम नाही ही एक भीती बंडखोर मंत्र्यांना सतावत असावी, त्याचा मुकाबला करण्याची क्षमता त्यांचे नसावी. 

५) काहीच मताचे..  जातीय मतदानाचे गणित एक दुसऱ्याशी  निगडित असते म्हणून तो तिकडे गेला तर मी येथे कशाला थांबू? म्हणजे तो तिकडे गेला तर त्याची मते मला मिळणार नाहीत म्हणजेच निवडून येणार नाही ह्या भीतीपोटी बंडखोरांचे छावणीत जमा झाले.

६) शिवसेना काय, बंडखोर काय, भाजप काय? काय फरक पडतो मंत्री पद शाबूत राहील असा विश्वास काहीना वाटत असावा. सत्तेत रहाणे महत्वाचे.  

७) यातील काही म.वी.आ. त नावापुरते पण भाजप कडे कल जास्त असलेले.. असा व्यावहारिक, राजकीय, स्वार्थी, हिशोब करुन बंडखो र ग्रुप मध्ये जमा झाले आहेत.. 

८) शिवाय भाजप कडून आर्थिक प्रलोभन ईडी कडून नोटिसा येणे मतदार संघात ढुंकूनही न पाहणे जनतेशी व पक्षाशी संबंध न ठेवणे असे लोकही एकनाथ शिंदेंकडे जमा झाले आहेत.
 
हिंदू हिंदुत्व एक बहाना आहे त्या बहण्याची काम करणारा शेतकरी शेतमजूर कामगार यांचे काही घेणे देणे नाही ते २.५ वर्षे सत्तेत राहिले त्यावर कोणते हिंदुत्व दुर्लक्षित झाले? याबाबत ते बोलूही शकत नाहीत? दुसरीकडे मंदिरे बांधणे, मुस्लिम द्वेष वाढवणे, तरीपण खऱ्या हिंदूंच्या मूळ प्रश्न बगल देणे साठी जातीय धार्मिक तेढ अपप्रचार.. फर्जी राष्ट्रवाद चा उदो उदो करणे भाजप जेव्हढे जमते तेव्हढे उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना जमणे शक्य नाही काँग्रेस तर गांधीवादी त्यांना असे करताच येत नाही (त्यांचेतील पुढारी किती काँग्रेस, म. गांधी यांच्या आदर्शवत व्यवहार करतात ही संशोधनाची बाब आहे असो) शेवटी सर्वच जनतेच्या प्रश्नापेक्षा सत्तेची लालसा असणारे, ह्या सर्वांची खात्री गोळाबेरीज करून टप्प्याटप्याने बंडखोर गट वाढत गेला. 

प्रखर राष्ट्रवादी, खास हिंदुत्ववादी, जाज्वल्य देशभक्त, असे ढोंग करणारा, खाजगीकरण.. सरकारी मालमत्ता विक्री वादी, महागाई, बेरोजगारी वाढीचा शिल्पकार भाजप या देशातील मोठ्या पक्षाचा यांना मिळणारा खंबीर पाठिंबा यामुळे बंडखोर नाट्य घडून आले आहे.. असा निष्कर्ष निघतो.

लेखक... अमृत महाजन, जळगाव
+91 98605 20560

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...