समाजसेविका सोनाली शशिकांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा !!
कल्याण, बातमीदार : भाजपचे कार्यकर्ते व समाजसेविका सोनाली शशिकांत पाटील याचा वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 7 पेनल क्रमांक 5, अटाळी वडवली मोहने मांडा उपाध्यक्ष मोहोने टिटवाळा मंडळ शशिकांत गोपाल पाटील, भाजपाचे समाजसेविका सोनाली शशिकांत पाटील यांनी आपल्या प्रभागातील मुलांसाठी मोफत वह्या वाटप यावेळी करण्यात आले. यावेळी त्यांनी आपला वाढदिवस हा सामाजिक कार्यतून साध्या पध्दतीने साजरा केला.
वाढदिवसाला होणाऱ्या खर्चातून त्यांनी आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले. यावेळी प्रमुख उपस्थिती कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा रेखा चौधरी, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा केळकर, जिल्हा उपाध्यक्षा निर्मला पवार, सुचिता होळकर, माजी परिवहन सभापती रमेश कोनकर, मंडळ सरचिटणीस संतोष शिंगोळे, प्रमोद घरत, मंडळ उपाध्यक्ष विलास रंधवे मामा, सोशल मीडिया अध्यक्ष राजेश यादव, अनुसूचित जाति मोर्चा उपाध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष कैलास पाटील, वाडा अध्यक्ष सारिका चोरगे, अध्यक्ष राजन पाटील, मंडळ सचिव संतोष विशे, महिला जिल्हा सचिव विमल भोसले, महिला मंडळ सचिव प्रतिक्षा बारोले, वेदवती शेट्टी, मलीका पुजारी, कार्यालय प्रमुख दीपक गोसावी, सचीन पाटील, दिलीप भोईर, सर्जेराव थोरात, विनू पाटील, बाबू ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीड हजाराहून विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होते.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण..

No comments:
Post a Comment