Friday, 24 June 2022

सुधाश्री संस्थेमार्फत गरीब व गरजू अशा २१ विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप !!

सुधाश्री संस्थेमार्फत गरीब व गरजू अशा २१ विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप !!


डोंबिवली, बातमीदार : राष्ट्रीय शिक्षण संस्था, संचलित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर रामचंद्र नगर, प्राथमिक, डोंबिवली या मराठी माध्यमाच्या शाळेत गुरुवार दिनांक २३ जून रोजी सुधाश्री संस्थेच्या मदतीने शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शालिनी डुंबरे व शाळा समिती सदस्या ॲड. माधुरी जोशी यांनी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. 


कार्यक्रमास सुधाश्री संस्थेच्या अध्यक्षा ॲड. माधुरी जोशी तसेच कुटुंबीय बळवंत जोशी व अजिंक्य जोशी,  शाळा समिती सदस्य शीला गवळी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे शाळा समिती सदस्य शीला गवळी यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाळा समिती सदस्य शीला गवळी यांचे शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शालिनी डुंबरे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. 

सुधाश्री संस्थेमार्फत शाळेतील कोव्हिड काळात आर्थिक  परिस्थितीने ग्रासलेल्या गरीब व गरजू अशा २१ विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. ॲड.  माधुरी जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने सुधाश्री संस्थेच्या आयोजकांचे आभार मानण्यात आले तसेच त्यांनी केलेली मदत विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल हे आश्वासन देण्यात आले.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण.. 

No comments:

Post a Comment

ऐरोली-काटई फ्रीवेचे उर्वरित काम दृष्टीपथात: भूसंपादनाची प्रक्रिया सुरु !!

ऐरोली-काटई फ्रीवेचे उर्वरित काम दृष्टीपथात: भूसंपादनाची प्रक्रिया सुरु !! *कल्याण, प्रतिनिधी* मुंबई फ्रीवेच्या धर्तीवर उभारण्यात...