Sunday, 26 June 2022

शहाड येथील नाल्यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली पाहणी !!

शहाड येथील नाल्यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली पाहणी !!

"माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माहिती दिल्यानंतर कपिल पाटील अधिकाऱ्यांसह पाहणीला ; यंदाच्या पावसाळ्यात पाणी वाहून नागरिकांना त्रास होऊ न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना"


कल्याण, बातमीदार : कल्याण पश्चिम मधील शहाड येथील नव अंबिका नगर सोसायटी, खेमजी चाळ, अवनी सोसायटी, शुभम मार्बल या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात नाली तुंबून मोठ्या प्रमाणात पाणी सोसायटी परिसर व घरात शिरते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो हे लक्षात घेऊन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी काल भेट देऊन पाहणी केली होती, त्यासंदर्भात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना याची फोनवर माहिती दिली होती, याची माहिती मिळाल्यानंतर आज तातडीने कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत सदर ठिकाणचा पाहणी दौरा केला व नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. 


सदर ठिकाणी उल्हास नगर परिसरातून सांडपाणी मोठ्या प्रमाणात प्रवाहित होते, पावसाळ्यात पाणी वाढल्यानंतर हेच नाल्याचे पाणी ड्रेनेजमार्फत थेट सोसायटी व घरांमध्ये घुसते, यावर तातडीने कार्यवाही करून या पावसाळ्यात अशा घटना घडू नये याची काळजी घ्या अशी सक्त ताकीद केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली.


यावेळी रेल्वे, उल्हासनगर महानगरपालिका व कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी या दौऱ्यात उपस्थित होते. कपिल पाटील व नरेंद्र पवार यांच्या या प्रश्नाला गांभीर्याने घेत तातडीने त्यावर काम करण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले.


यावेळी यावेळी मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, कल्याण शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, भाजप वार्ड अध्यक्ष मोहन कोनकर, कमलाकर घोलप, राणा सिंह, कुणाल मिरकुटे,अनुप सिंह,अझीम शेख,वर्षा सूथार,अंबिका नगरचे चेअरमन विजय हांडे, सेक्रेटरी संतोष रणदिवे, खजिनदार श्रीकांत खिसमतराव, अनिल सिंग, आशू शिंदे, पंकज पाचपिंडे, अरुण सिंह, अनिल मिश्रा, सुमन सांगळे, अनिता वर्पे आदी. तसेच अंबिका नगर, अवनी बिल्डिंग, ओम कृष्णा पुरम, खेमजी चाळीतील रहिवाशी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...