महाराष्ट्रात सुधारणावादी हिंदुत्व विरुध्द परंपरावादी कट्टर हिंदुत्व अशी वैचारिक लढाई सुरू झाली आहे. !
सध्याचे महाराष्ट्राचे राजकारणातील शिवसेना विधिमंडळ पक्ष, ना एकनाथ शिंदे यांचे बंड व त्यात उद्धव ठाकरेंचे अडीच वर्षातील राज्य कारभाराचे मूल्यमापन केले तर लक्षात येते की ..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे परंपरावादी सनातनी हिंदुत्ववाद चे पुरस्कर्ते नसून सुधारणावादी हिंदुत्व मानतात. असाच त्यांचा भाषणे व व्यवहार वरून दिसते. गेल्या अडीच वर्षात कुठलाही आक्रस्थाळे पणा नाही की भाजप करतो तशी कट्टर त्वेषाची /द्वेषाची भाषा नाही विशेष म्हणजे त्यांचे शिवसैनिक ही अत्यंत संयम शीलतेचा व्यवहार करीत आहेत. ठाकरेंनी स्टंट गिरी वा मूळ समस्या दाबणेसाठी भावनिक मुद्दे निर्माण उकरून सदैव त्यांचेच नावाची चर्चा होत राहील.असे कधी केले नाही.
त्यांचे राज्यात अल्पसंख्यांक, दलित जनतेत विश्वासाचेच वातावरण पहावयास मिळाले. ज्यांना हे पसंत पडले नाही ते त्यांच्या समविचारी पक्षात निघून गेले. ते काही वावगे नाही. आय टक ने आयोजित केलेल्या एका आंदोलनाला पाठिंबा देताना मुंबईला एका भाषणाला उद्धव ठाकरे उपस्थित होते ते म्हणाले होते की, छ. शिवराय जनतेचे गाऱ्हाणे ऐकत; कोणी नाराज झाल्याचे समजले तर माझे काही चुकले तर नाही? असे मानून रयतेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत.शिवसेना नेमकी तशीच कार्यपद्धतीची आहे. असे त्यांनी ठासून सांगितले.
नेमकी तीच कार्यपद्धती त्यांचे मूख्यमंत्री पदाचे काळात अनुभवास येत आहे. त्यांना मेल ने केलेला अर्ज व्यवहाराचे उत्तर ही दिलासा दायक असते. गेले अडीच वर्षे महाराष्ट्र द्वेषाचा राजकारणापासून अलिप्त ठेवला हे एक त्यांचे मोठे यश आहे. आणि शिवसेना कधी फुटते आणि आपण कधी सरकार बनवतो या मनसुब्यात असलेल्या भाजप नेत्यांची ती ही एक पंचायत आहे. असो; त्यांचे सहकारी संजय राऊत यांचे सामना मधील लेख आणि प्रकट विचार भाजप सारख्या कट्टर जातीयवादी राजकारण करणारा पक्ष व व्यक्तींना झणझणीत अंजन देणारा असतो. म्हणून भाजप व गोदी मिडिया हे त्यांनाच कधी कधी जास्त टार्गेट करताना दिसतात. लोकांना अन्न रोजगार महागाई शेतमालाचे भाव हे प्रश्न महत्वाचे वाटतात.. . नेमके भाजप व गोदी मिडीयाला ते नको आहे. त्यांना बाबर, चांगिझ खान, औरंगजेबाने केलेले कथित अत्याचार, अपमान आणि त्यापूर्वी शेकडो वर्षांपूर्वीचा मनुवादी व्यवस्थेतील चातुर्वर्ण्यस्थित गौरवशाली इतिहास ह्या विषयावर जनतेला घेऊन हवेवर तरंगत ठेवणे हाच.. महत्वाचा अजेंडा वाटतो. खर म्हणजे बाबर, औरंगजेब, चांगिज खान, कालीन राजे त्यांचे वारस अवशेष त्यावेळची जनता पैकी सध्या काही हयात नाही पण गत इतिहासातील राज्यकारभार त्यातून पुढील भारताचे वाटचालीस जे फायदेशीर तेव्हढे सार टाकून १९५० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखित संविधान मात्र आपल्यासमोर आदर्श आहे.. त्यातच सुधारणावादी हिंदुत्व पांथनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, समाजवादी लोकशाही सर्वधर्म समभाव, सुधारणावादी, राजकारण्यांना जे आवश्यक वाटेल ते घेऊन राज्यकारभाराची मार्गदर्शक सूत्रे मात्र सामावलेली आहेत पण कट्टरता वादी राज्यकर्ते यांना ते पचनी पडताना दिसत नाही. त्या अर्थाने पाहिल्यास मा. उद्धव ठाकरेंची भाषणे व त्या अनुरुप संवे धाणिक व्यवहार केंद्राच्या मोदी यांच्या सत्तेला मंजूर नाही म्हणून त्याचे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, प्रवक्ते, गोदी मिडिया, हे शिवसेना मध्येच बंडाळी माजवून त्यातील आमदारांना फोडून उद्धव ठाकरे यांची सत्ता उलथवण्याच्या सतत प्रयत्नात आहेत. सध्यातरी काँग्रेस राष्ट्रवादी यांचे आमदार त्यांच्या गळाला लागलेले नाहीत पण त्रास देणे मात्र सुरू आहे. एकनाथ शिंदे व ४० आमदारांनी केलेल्या या वादात कायदेशीर लढाई चालेल त्या मध्ये भाजप सत्तेचा लचका मिळतो याची चाचपणी करेल.
राज्यपाल न्यायसंस्था यांचा वापर करून पाहील आणि नेहमी प्रमाणे ईडी/ सीबीआय चा धाक वापरेल आणि जे घाबरतील ते त्यापुढे नंग्या टाकतील. पण भाजपला सत्ता गवसली तर २०२४ पर्यंत महाराष्ट्राचे राजकारण द्वेषाचे उंबरठ्यावर आणून सोडेल म्हणजे लोकसभेत महाराष्ट्रात भरीव आकडा कसा मिळेल याचा प्रयत्नात राहील. एकूण महाराष्ट्रात सुधारणावादी हिंदुत्व विरुध्द द्वेष निर्माण करणारे कट्टर परंपरावादी हिंदुत्व वादी अशी लढाई सुरू झाली आहे.
*द्रुमुक चे रस्त्यावर शिवसेना गेल्यास भाजप हद्दपार होईल*
तामिळनाडूत अद्रमुक/ द्रमुक हे दोन प्रादेशिक पक्ष सुधारणावादी पेरियार यांचे विचारसरणीवर काम करतात त्यांना काँग्रेस डावे व इतर साथीदार मिळतात पण कट्टरता वाद पासून तो प्रांत अलिप्त आहे महाराष्ट्राला ही शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधन कार ठाकरे जोडीला कॉ. डांगे, पत्रकार अत्रे, सेनापती बापट आदी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढाऊ नेत्यांची परंपरा आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विचारांचे हत्यार व्यवस्थित वापरले तर भाजप सत्तेच्या आसपासही घिरट्या घालणार नाही. राज्यातील जनता सुधारणावादी पक्ष, संस्था याना असेच विश्वासात घेऊन काम करीत राहिले तर सध्याचे उद्धव ठाकरे सरकार यांना शिवसेना वरील जुनी कात काढून टाकण्याची संधी आहे असे वाटते..
लेखक.. कॉम्रेड अमृत महाजन, जळगाव
📞 9860520560

No comments:
Post a Comment