Friday, 24 June 2022

पोलिसांचा सुरेख आवाज ठाणे येथील ' व्होईस ऑफ ठाणे स्पर्धेत ' !

पोलिसांचा सुरेख आवाज ठाणे येथील ' व्होईस ऑफ ठाणे स्पर्धेत ' !


डोंबिवली, ( शंकर जाधव ) : अनेक चित्रपटात आपल्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करून महाराष्ट्रातील अनेक पोलिसांनी आपली कला सादर केली होती. आता पोलिसांचा सुरेख आवाज ठाणे येथील`व्होईस ऑफ ठाणे स्पर्धेत` ऐकण्यास मिळणार आहे. युटूब आणि फेसबुक सारख्या मध्यामानातून या पोलिसाला अनेकांनी पसंती दर्शविली आहे. २१ स्पर्धकांमध्ये पोलिसाची निवड झाली असून २६ जून रोजी ठाणे येथील बौद्ध समाज उन्नती मंडळ समाज सभागृहात होणाऱ्या स्पर्धेच्या अतिंम फेरीत पोलीस विजयी ठरवा अशी अपेक्षा पोलीस खात्याकडूनच नव्हे तर डोंबिवलीकरहि व्यक्त करत आहेत.

    डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल मांडगे यांची आवाज`व्होईस ऑफ ठाणे` स्पर्धेत निवड झाली आहे. नुकतेच ठाकुर्ली येथील हॅप्पी स्ट्रीट मध्ये मांडगे यांनी सादर केले गान एकूण कल्याण परिमंडळ -३ चे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कौतुक केले होते. एवढेच नव्हे उपस्थित नागरिकांनी मांडगे यांच्या गाण्यावर डान्स केला होता. मांडगे यांना मिळालेली हि कौतुकाची थाप थेट स्पर्धेत उपयोगी होईल असा विश्वास व्यक्त केला.

 मांडगे यांचे तीन मोठे ऑपरेशन झाले. अश्या कठीण प्रसंगातून मांडगे बाहेर पडले. देवाने आपल्याला वाचवल आता आपण दुसऱ्यासाठी जगाव असा विचार करून मांडगे यांनी आपली गाण्याची कला जोपासली. सुरुवातील काही पोलिसांसमोर आपल्याला सुरेख आवजाने गीत सादर केल्यावर मिळालेल्या टाळ्यांची साथ पुढे कायम राहिली. स्टेज शो करताना हे पोलीस आहे यावर सामान्य नागरिकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र काम करताना आपली कला जोपासल्याबद्दल वरिष्ठांकडून नेहमीच प्रोत्साहन  मिळाल असे मांडगे म्हणतात. स्व. रमेश देव यांचे` सूर तेच छेडीता. गीत उमटले नव्हे`,` और इस दिल मे क्या रखा हे` अशी दोन गाणी आवड असल्याचे मांडगे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सैतवडे बलभिमवाडी येथे 10 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सैतवडे बलभिमवाडी येथे 10 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन !...