Wednesday, 27 July 2022

कल्याण पंचायत समितीचे बीडीओ अशोक भवारी यांची कातकरी मजूराच्या घरी भेट, मदत करण्याच्या सूचना !

कल्याण पंचायत समितीचे बीडीओ अशोक भवारी यांची कातकरी मजूराच्या घरी भेट, मदत करण्याच्या सूचना !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पाचवामैल येथील कातकरी मजूर अशोक सुक-या वाघे यांच्या घराची भिंत रात्री कोसळली होती. या बाबतचे वृत्त पत्रकार संजय कांबळे यांनी विविध सोशल मिडियातून प्रसिद्ध करताच कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी ताबडतोब वाघे यांच्या घरी भेट देऊन १५ टक्के मधून या कुंटूबाला मदत करून यांच्या नवीन घराचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना कांबा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती पाटील यांना दिल्या.


कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून कांबा ग्रामपंचायतीची ओळख आहे. या ग्रामपंचायत हद्दीत पाचवामैल येथे राहत असलेले कातकरी मजूर अशोक सुक-या वाघे याचे रात्री घराची भिंत कोसळली, गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या इतरही भिंती दुभंगलेल्या आहेत, त्याही कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत, या आशयाची बातमी पत्रकार संजय कांबळे यांनी विविध सोशल मिडियातून प्रसिद्ध करताच कल्याण पंचायत समितीचे कर्तव्यनिष्ठ गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी ताबडतोब पाचवा मैल येथील वाघे कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या कुटुंबात अशोक वाघे, पत्नी वंदना वाघे, मुलगा प्रकाश वाघे, मुकेश वाघे, आणि कार्तिक वाघे असे सदस्य राहत असून यांच्या घरांची भिंत रात्री कोसळली, तसेच इतरही भिंती कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे बीडीओ अशोक भवारी यांनी तात्काळ १५ टक्के मधून मदत करून वाघे यांच्या नवीन घराचा प्रस्ताव ताबडतोब कल्याण पंचायत समितीला पाठवावा असे आदेश ग्रामसेविका श्रीमती सुनंदा पाटील यांना दिले. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ जबाबदारी मुळे अशोक वाघे यांना न्याय मिळेल, त्यामुळे कांबा ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप पावशे यांनी त्यांचे आभार मानले आहे.

No comments:

Post a Comment

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...