Wednesday, 27 July 2022

महेश जाधव यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न !

महेश जाधव यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न !


कल्याण, बातमीदार : विभागातील दहावी व बारावी परीक्षेत मिळविलेल्या उज्वल यषाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे उपस्थितीत विभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार तसेच विद्यार्थी भविष्य मार्गदर्शन व्याख्यान नरेंद्र शिर्के सर मुंबई यांच्यावतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कल्याण शहर उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमास विभागातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला व व्याख्यानाचा देखील लाभ घेतला. कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, निरजा मिश्रा, नितीन सकपाल, उमेश पी., सुनील शेट्टी, मयूर केने, साधना, प्रकाश भोईर, सिद्धेश खापरे, जालिंदर सूर्यवंशी, भावेश परमार, विनोद कुलकर्णी, मोसिन शेख, हसन शेख, तनु पठाण, पुरुषोत्तम जोशी, आदी कार्यकर्ते, मान्यवर, ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मिनल महेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी अथक परिश्रम घेतले. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व मान्यवरांचे महेश जाधव यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...