जव्हार- जितेंद्र मोरघा :
जव्हार, ता. जव्हार तालुक्यातील खरवंद आणि डेगाचीमेंट येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. या यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे उदघाटन पंचायत समिती सभापती सुरेश कोरडा, उपसभापती चंद्रकांत रंधा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले, सरपंच विठ्ठल थेतले, पत्रकार नामदेव खिरारी व शेतकरी प्रितेश चौधरी उपस्तीत होते.
खरवंद आणि डेंगाचीमेट येथील बचत गटाची निवड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून करण्यात आली आहे. आता सध्या मजूर मिळत नाहीत आणि मजुरीही खूप वाढली आहे. त्यामुळे शेती करणे शेतकऱ्यांना परवडत नाहीत त्यामुळे अडचणी वाढ होत असतात. या यंत्रामुळे वेळेची बचत होते, मजुरांची कमतरता भासत नाही आणि कमी खर्चात लागवड असल्याने यांत्रिक पद्धतीने शेती करणे शेतकऱ्याला परवडत आहे. यावेळी खरवंद येथील उज्वल या पुरुष बचत गट आणि डेंगाचीमेट येथील महिला बचत गटाची लागवड करण्यात आली होती. या दोन्ही बचत गटाला कोसबाड येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. यामध्ये भाताचे वाफे कसे तयार कसे करायचे, रोप किती दिवसांचे असावे, यंत्र कसे चालवायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचं खूप फायदा मिळाला आहे. खरवंद येथे २५ हेक्टर ,आणि डेंगाचीमेट येथे २० हेक्टर वरती लागवड होणार आहे. या लागवड केलेल्या क्षेत्राची फवारणी ड्रोन द्वारे करण्यात येणार आहे तशेच कापणी सुद्धा यंत्रा द्वारे करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी कडून सांगितले आहे. भात लावणी यंत्र, ड्रोन आणि कापणी यंत्र हे साहित्य बचत गटांना हेक्टरी नऊ हजार रुपयांनी उपलब्ध करून देणार असल्याचे असल्याचे नागरे यांनी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment