Tuesday, 26 July 2022

जव्हार मध्ये,केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचा निषेध ! ----वाढती महागाई, गँस, पेट्रोल दरवाढ, ईडी चौकशी, जी एस टी विरोधात कार्यकर्त्यांचा एल्गार....

जव्हार मध्ये,केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचा निषेध !

----वाढती महागाई, गँस, पेट्रोल दरवाढ, ईडी चौकशी, जी एस टी विरोधात कार्यकर्त्यांचा एल्गार....


जव्हार- जितेंद्र मोरघा :

      केंद्र सरकार राजवटीत देशात सुरु असलेल्या वाढत्या महागाई विरोधात आंदोलनाचे हत्यार उगारुन जव्हार तालुक्यात काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला. शहरातील गांधी चौकात काँग्रेस कार्यकर्ते एकत्र जमून भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
       मोदी सरकारने केलेली पेट्रोल,डिझेलची वाढीव दरवाढ, गँसची दरवाढ, जीएसटी कर, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसासानीची भरपाई मिळावी, काँग्रेस नेत्यांवर चालवलेली ईडीची चौकशी. याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांचा जयजयकार करत भाजपाचा निषेध केला.
       याप्रसंगी काँग्रेसचे बळवंत गावित पालघर जिल्हा अध्यक्ष आदिवासी सेल, संपत पवार जव्हार तालुका अध्यक्ष व काँग्रेस कायकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन ! पेण (पंकजकुमार पाटील) :  पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ता...