Friday, 1 July 2022

गावदेवी नगर, कोळेगाव येथील नागरिकांचे हाल ; वारंवार तक्रारी करुनही प्रशासन ठप्प !

गावदेवी नगर, कोळेगाव येथील नागरिकांचे हाल ; वारंवार तक्रारी करुनही प्रशासन ठप्प !


डोंबिवली, बातमीदार : कोळेगाव, गावदेवी नगर (डोंबिवली) येथे पावसाचे पाणी काही घरात शिरून येथील कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. अनधिकृतपणे परस्पररित्या मातीचा भराव टाकून नैसर्गिक नाले बुजविल्याचा रहिवाशांना फटका बसला.


पावसाचे पाणी प्रभाग 120 मधील काही घरांच्या आवारात घुसले. संबंधित प्रभागातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले की आम्ही वारंवार तक्रार करुनही प्रशासन लक्ष देत नाही, येथील पाणी निचऱ्याचे दोन मोठे हायवे शेजारील नैसर्गिक नाले अनधिकृत बांधकाम व्यावसायिक यांनी भरणी करून बंद केले आहेत. यामुळे गेले सहा सात वर्षांपासून पाणी साचते तसेच आमच्या घरात पाणी शिरल्यावर सर्व सामानाचे नुकसान होते, रहाण्याची अगदी जेवण ते झोपण्यापर्य॔त सगळी अडचण होते.

आम्ही या संदर्भात प्रभाग क्षेत्र अधिकारी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त व संबंधित सर्वांना अनेक वेळा अनेक तक्रारी करण्यात आल्या असून सुध्दा काही कारवाई नाही. आम्ही आपल्या माध्यमातून आयुक्त व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी आमची दखल घेऊन तात्काळ कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...