मुरबाड तालुक्यातील घरकुल यादीत झालेल्या घोळाची सखोल चौकशी करण्यासाठी गटविकास अधिका-यांना निवेदन !
मुरबाड, (प्रतिनिधी ) : मुरबाड तालुक्यात सन 2020-2022 या वर्षात पंतप्रधान आवास घरकुल योजनेत फार मोठा घोळ झाला असुन, गरीब, गरजु,व पात्र लाभार्थ्यांना डावलून ,धनदांडगे, नोकरदार, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, यांना घरकुल योजनेत प्रथम प्राधान्य देऊन गरीबांसाठी असलेल्या योजनेत गरीब गरजूंनाच डावलण्यात आल्याने समाजसेवक मंगल डोंगरे यांनी अखेर गटविकास अधिका-यांना लेखी निवेदन देऊन घरकुल सर्वेक्षणात झालेल्या हलगर्जीपणाची चौकशी करून, सदरची मंजूर यादी स्थगित करावी.व चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्याची व पुन्हा नव्याने यादी तयार करण्याची मागणी केली आहे.
मुरबाड तालुक्यात कष्टकरी, कामगार, भुमिहिन, बेघर अशा लोकांची संख्या मोठी असताना, दलित पिडीत, विधवा महिला, गरीब व गरजु लोकांना डावलून सदरची यादी केली असुन, त्यात विविध राजकीय पक्षांचे पुढारी,पदाधिकारी, कार्यकर्ते, नोकरदार, तसेच एकाच घरात, कुटुंबात, एकापेक्षा अनेक जणांना लाभ दिल्याचे निदर्शनास येत असून, वंचित घटक या योजनेपासून दुर फेकल्याच्या अनेक तक्रारी पंचायत समितीत आल्या आहेत. मात्र त्यावर कोणतीच उपाय योजना नसल्याचे जबाबदार अधिका-यांकडुन सांगितले जाते.याशिवाय सदर योजनेत आमचा काहीच संबंध येत नसल्याचे गटविकास अधिकारी रमेश अवचार,व विद्यमान सभापती सौ. स्वराताई सचिन चौधरी ह्यांनी सांगितले. आॕनलाईन पाञ यादीतील लाभार्थी निवडीचे अधिकार ग्रामसभेला दिले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले असून, ज्यांच्याकडे सुस्थितीतील दोन दोन घरे,जमीन जायदाद, नोकरी, असणा-या आणि एका एका घरात तिन तिन जणांना कुठल्या आधारावर घरकुले दिली गेली. कि ज्यामुळे बेघर, बेरोजगार पात्र लाभार्थी कायम वंचित राहिले गेले. त्यामुळे अशा घटकांना घरकुल योजनेचा प्रथम प्राधान्याने लाभ मिळावा, यासाठी पञकार तथा समाजसेवक मंगल डोंगरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, सध्याची मंजूर यादी स्थगित करून चुकीचा सर्वेक्षण करणा-या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करावी व नवीन यादी बनवून पात्र लाभार्थी, गरीब गरजु घटकांना न्याय द्यावा. अशी मागणी गटविकास अधिकारी श्री. अवचार यांचेकडे केली आहे.मात्र गोरगरिबांना न्याय न मिळाल्यास आम्हाला प्रशासनाच्या विरोधात विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन व उपोषणा सारखे हत्यार उपसावे लागेल. असा इशाराही यावेळी या पत्राद्वारे देण्यात आला आहे.
{ **याबाबत तालुक्यातुन अनेक ग्रामपंचायत मधून नागरिकांनी लेखी तक्रारी केल्या असुन रामदास चौधरी, पुंडलिक मारुती कंटे, दत्तात्रय चौधरी यांच्या तक्रारीना प्रशासना कडून केराची टोपली दाखविण्यात आली असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. ज्यामध्ये आंबेटेंभे, कळमखांडे गावात सधन कुटुंबातील दोन दोन लाभार्थी, चिरड येथे ही हाच प्रकार घडला असल्याची तक्रार दाखल आहे. उलटपक्षी या तक्रारींची कुठलीच चौकशी न केल्यामुळे भ्रष्टाचाराला अभय मिळत आहे. **}
यावेळी पत्रकार दिलीप पवार, दत्ता माळवे, शंकर करडे, चंद्रकांत धनगर, भाजपा कार्येकर्ते दत्ता डोंगरे उपस्थित होते.


No comments:
Post a Comment