Friday, 1 July 2022

महाराष्ट्रातील हरित प्रणित क्रांतीचे जनक ; वसंतराव नाईक यांचा जन्मदिन म्हणजे 'महाराष्ट्र कृषी दिन'

महाराष्ट्रातील हरित प्रणित क्रांतीचे जनक ; वसंतराव नाईक यांचा जन्मदिन म्हणजे 'महाराष्ट्र कृषी दिन' 


मुंबई, बातमीदार : आज महाराष्ट्राचा ३३ वा कृषी दिन ; राज्यात १ जुलैला कृषी दिन साजरा करण्यात येतो. हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून साजरा करण्यात येते. वसंतराव नाईक यांचं कृषी क्षेत्रात मोठं योगदान असुन राज्यातील हरित क्रांतीचे जनक अशी त्यांची ख्याती आहे.

महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये स्व. वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे.यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती 'महाराष्ट्रात कृषी दिन' म्हणून साजरी केली जाते. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन" असे वसंतराव नाईक यांनी १९६५ मध्ये सांगितले होते.

देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यही कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य राज्य समजलं जातं.

वसंतराव नाईकांच्या काळात राज्यात कृषी विद्यापीठं आणि कृषीशी संबंधित विविध संस्थांची निर्मिती झाली. राज्यात १९७२ साली ज्यावेळी दुष्काळाचं संकट आलं होतं त्यावेळी त्यांनी अनेक उपाययोजना राबवल्या. त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणं उपलब्ध करून दिली, जलसंधारणाची कामं वाढवली आणि शेतीला शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला. नंतरच्या काळात त्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याचं दिसून आलं. त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्राच्या बाबतीत देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जातं.



No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...