सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयाज मौलवी व तंजिला मौलवी यांच्यातर्फे मोफत वह्या वाटप !
कल्याण, बातमीदार : जिल्हा उपाध्यक्ष आयाज मौलवी माजी नगरसेविका तंजिला मौलवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कल्याण डोंबिवली जिल्हा संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. या वेळी पालक वर्ग मोठया संख्येन उपस्थित होते. लहान मुलांच्या हातून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी ठाणे जिल्हा महिला निरीक्षक मायाताई कटारिया, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस सारिका गायकवाड, कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष सूरया पटेल, जिल्हा उपाध्यक्ष रेखा सोनवणे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस सुनीता देशमुख, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी महिला मीनाक्षी आहेर, जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र यावलकर, कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, योगेश माळी, तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण


No comments:
Post a Comment