म्हारळ वरप कांबा यंदाही सालाबादप्रमाणे खड्यात, कल्याण मुरबाड मार्गावर वाहतूक कोंडी, आमदार, खासदार, मंत्री, मस्त, जनता त्रस्त ?
कल्याण, (संजय कांबळे) :दरवर्षी प्रमाणे याही वेळी म्हारळ पाडा, वरप, कांबा ,पाचवामैल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले असून यामुळे कल्याण मुरबाड महामार्गावर तूफान वाहतूक कोंडी होत आहे. या भागातील आमदार, खासदार, मंत्री सत्तेच्या सारीपाटात मस्त रमले असून जनता मात्र दिवसेंदिवस त्रस्त झाली आहे.
कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळ, पाडा, वरप मधील, ओमकार नगर, सिमा रिसाँर्ट, बंजरग हार्डवेअर, दुर्गानगर, मारुती मंदिर, सिक्रेट हार्ट स्कूल, टाटा पावर,पेट्रोल पंप, कांबा बस थांबा, पुढे पावशेपाडा, पाचवामैल येथे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असायचे, परंतु मागील वर्षी शहाड उड्डाणपूल ते म्हारळ पाडा येत पर्यंत सिमेंट क्राँक्रिटीकरण केल्याने येथे खड्डे नाहीत, परंतु पुढे रस्त्याचे काम सुरू असल्याने आता खड्यांच्या बरोबरच चिखल देखील मोफत आहे, त्यामुळे खड्डय़ामुळे मान, कंबर दुखीसह कपड्यावर रंगरंगोटी देखील होत आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याने जनतेच्या त्रासाची पंरपरा कायम राहिली आहे. केवळ कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी या तालुक्याचा विचार केला तर शेकडो प्रश्न आहेत तसेच आहेत. पाणी टंचाई, रस्ते, गटारे,खड्डे, कचरा, डंम्पिंग, उल्हास नदीतील जलपर्णी, अनाधिकृत बांधकामे,शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, कामगाराचे प्रश्न, बंद पडत असलेले उद्योग धंदे, कोरोनाचे वाढते रुग्ण, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे रखडलेले पगार, आदी कितीतरी प्रश्न, अडचणी, समस्या असताना, लोकांनी निवडून दिलेले सरकार मधील आमदार, खासदार, मंत्री हे बंडखोरी करून पहिल्यांदा सुरत, नंतर गुवाहाटी मग गोवा फिरतात आणि तेथे, काय डोंगर, काय झाडी, काय दरी,काय हाटेल, असे निर्लज्जपणे सांगतात याला काय म्हणावे?
इकडे बळी राजाला बियाणे, खते,विहिरीचे बिल वेळेवर मिळेना म्हणून तो आत्महत्या करण्याचे बोलून दाखवतो,तर दुसरीकडे आपल्या राज्याचे कृषिमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, शिक्षणमंत्री, गुवाहाटीत हाटेला मस्त मजा करत होते, आणि इकडे समाजातील सर्व घटक, विविध समस्यां नी त्रस्त आहेत, याचा जनतेने गंभीरपणे विचार करायला हवा, भविष्यात यांना त्यांची जागा दाखवणार असे शेतकरी सुरेश गायकवाड यांनी सांगितले. तर या परिसरातील खड्ड्यात या भागातील लोकप्रतिनिधी ना गाडावे लागेल अशी संतापजनक प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राम भोईर यांनी दिली.


No comments:
Post a Comment