कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!
*कल्याण, प्रतिनिधी* : कल्याण पूर्व आणि श्री मलंग विभागातील वीजपुरवठा, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व तक्रारींबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कल्याण पूर्वच्या भाजपाच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी पावसाळ्यात अखंड वीजपुरवठा आणि भविष्यातील वीज प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत कल्याण पूर्वमधील प्रस्तावित स्विचिंग स्टेशन, RDSS योजनेअंतर्गत नवीन वीज प्रकल्प, विविध भागांतील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण, स्मार्ट सोलर योजना आणि पावसाळ्यात खंडित होणारा वीजपुरवठा रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. वारंवार होणारे बिघाड, ट्रान्सफॉर्मरचे ओव्हरलोडिंग आणि गळतीच्या तक्रारींवर तातडीने उपाय करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
कल्याण पूर्वमधील नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक कामांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची बांधिलकी यावेळी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी स्थानिक यंत्रणेशी समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
यावेळी MSEDCL चे मुख्य अभियंता श्री. जगदीश बोडके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सुनील राठोड आणि उपकार्यकारी अभियंता श्री. अमोल चौधरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment