भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याचा आदिवासी बांधवांनी केला आनंदोत्सव साजरा !!
मुरबाड (मंगल डोंगरे ) : 18 जुलै 2022 रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकशाही सरकारच्या उमेदवार असलेल्या आदिवासी समाजाच्या महिला उमेदवार "श्रीमती द्रौपदी मुर्मू, ह्या 21 जुलै 2022 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रचंड भरघोस मतांनी निवडून आल्या.
त्या घटनेचा आनंद काल मुरबाड तालुक्यातील मोहवाडी- वैशाखरे येथील आदिवासी बांधवांनी मोठ्या जल्लोषात पारंपारिक न्रुत्य करत एकमेकांना पेढे भरवत साजरा केला. यावेळी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार किसन कथोरे, भाजपा अध्यक्ष-जयवंतराव सुर्यराव सर ,सभापती- स्वरा चौधरी, माजी सभापती-दत्तु वाघ सर, दिपक पवार, माजी उपसभापती-सिमा घरत, माजी.पंस. सदस्य- अनिल भाऊ घरत, जि.प.सदस्या- जया वाघ, नंदा उघडा, सुरेश बांगर, गोविंद भला, माजी आमदार- क्रुष्णकांत तेलम, गोल्हे सर, युवा मोर्चाचे अध्यक्ष चेतन घुडे, यांसह मोठ्या संख्येने आदिवासी बंधु-भगिणी उपस्थित होते.
राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च पद आहे. काल परवा पर्यंत कुणाला फारसा माहित नसलेल्या पण आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःच्या नोकरीचा त्याग करणा-या व आदिवासी मुलांना दत्तक घेऊन, स्वतः शिक्षक बनून शिकविणा-या त्या शिक्षिका, त्यानंतर, नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, आणि झारखंड राज्याच्या राज्यपाल राहिलेल्या, ओरीसा राज्यातील मयुरभंज, जिल्ह्यातील अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबातील व्यक्तीमत्व असलेल्या द्रौपदी मुर्मू, अखेर राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या. आणि लोकशाही सरकारने सर्वसामान्य आदिवासी घटकांपर्यंत विकासाच्या योजना पोहचविण्याचा आपला हेतू साध्य केला.
**आदिवासी बांधवांनी मला भरघोस मतदान करून ,ख-या अर्थाने देशाचा राष्ट्रपती निवडण्याचा अधिकार दिला, आणि त्याच अधिकाराने मि एका आदिवासी भगिणीला मतदान करु शकलो, असे भावोद्गार आमदार किसन कथोरे यांनी यावेळी जल्लोष साजरा करताना केले, ** राज्यात आता पुन्हा भाजपचे सरकार आले असुन, आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात थांबलेली विकास कामे आता पुन्हा वेगाने सुरु होतील. असे आश्वासन यावेळी कथोरे यांनी उपस्थित आदिवासीना दिले. **सरकार तुमचे आहे.**




No comments:
Post a Comment