Friday, 22 July 2022

**बहुप्रतिक्षित कल्याण-मुरबाड रेल्वे हा माझाच प्रोजेक्ट आहे.** **रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव **

**बहुप्रतिक्षित कल्याण-मुरबाड रेल्वे हा माझाच प्रोजेक्ट आहे.** 

**रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव **


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार आणि आता भारतीय रेल्वेचे जनक असणाऱ्या नाना शंकरशेठ यांच्या मुरबाड या जन्म गावी रेल्वे नेणारे, भविष्यात मुरबाड रेल्वेचे जनक ठरणारे खासदार कपिल पाटील, यांच्या प्रंचड मेहनतीने, रेल्वे मंत्री, अश्विनी वैष्णव यांच्या भेटीने व भरीव आश्वासनाने, तसेच भावोद्गाराने पुन्हा एकदा मुरबाडकरांच्या आशा पल्लवित झाल्या असुन, कल्याण- मुरबाड रेल्वे प्रकल्प हा खासदार कपिल पाटील यांचा प्रोजेक्ट नसून, तो माझ्याच मतदारसंघातील प्रोजेक्ट असल्याचे भावोद्गार त्यांनी भेटी वेळी काढल्याने मुरबाड करांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

राज्यात भाजपा- शिवसेनेचे सरकार येताच कल्याण-मुरबाड रेल्वेच्या प्रलंबित कामाला राज्य सरकारकडून तत्काळ मान्यता देण्यात आली. तसेच राज्य सरकारने ५० टक्के खर्चाची हमी देण्याचे पत्र रेल्वे मंत्रालयाला पाठविले. तत्पूर्वी रेल्वे मंत्रालयाने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले होते. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी रेल भवन, नवी दिल्ली येथे भेट घेतली. तसेच रेल्वे मंत्रालयाला पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यावेळी श्री. वैष्णव यांनी कल्याण- मुरबाड रेल्वेमार्ग हा तुमच्या लोकसभेचा प्रोजेक्ट नसून, माझा महत्वाचा प्रोजेक्ट आहे, असे उद्गार काढले. तसेच या रेल्वे मार्गाबाबत सत्वर कार्यवाही करून येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत रेल्वेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, याची ग्वाही दिली.

रेल्वे मंत्र्यांकडेच मान्यतेचा अधिकार असल्याने
रेल्वे प्रकल्पांच्या मान्यतेसाठी तांत्रिक मुद्द्यांबरोबरच विविध मान्यतांमुळे जादा कालावधी लागण्याची शक्यता असते. मात्र, कल्याण- मुरबाड रेल्वे प्रकल्प हा एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीचा असल्याने त्याला मान्यता देण्याचा अधिकार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहे. ते या प्रकल्पासाठी अनुकूल असल्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे लवकर मार्गी लागणार असल्याची अपेक्षा आहे.
सध्याच्या रेल्वेच्या नियमावलीनुसार, कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाचे कार्यकारी संचालक समितीद्वारे मूल्यमापन होईल. त्यानंतर वित्तीय समितीच्या सदस्यांद्वारे तत्वतः मान्यता दिली जाईल. मुरबाड रेल्वे प्रकल्पाची निश्चित केलेली ८५७ कोटींची किंमत व त्याची व्यवहार्यता तपासून तो मंजुरीसाठी नीति आयोग व अर्थ मंत्रालयाकडे पाठविला जाईल. त्याला नीति आयोगाचे मूल्यांकन मिळाल्यानंतर २१ दिवसांत रेल्वेच्या विस्तारीत बोर्डाच्या बैठकीत मान्यता दिली जाणार आहे. या प्रकल्पाला रेल्वे बोर्डात अंतिम मंजूरी दिली जाऊन, त्याच्या प्रती नीति आयोग, अर्थ मंत्रालय आणि सांख्यिकी विभागासह सर्व सदस्यांना वितरित केल्या जातील. विशेष म्हणजे एखाद्या प्रकल्पाची किंमत १ हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्याला रेल्वे मंत्री मंजूरी देऊ शकतात. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...