म्हारळ जिल्हा परिषद शाळेत'ठिबक सिंचन, पिण्याच्या पाण्या अभावी शिक्षकासह विद्यार्थ्यांची गैरसोय ?
कल्याण, संजय कांबळे : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेत फुटलेल्या पत्र्यामुळे वर्गात, ठिबकसिंचन, सुरू असून गेल्या ९ महिन्यापासून शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे शिक्षकासह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे
कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२५ शाळा होत्या त्या आता १२०वर आल्या आहेत. तालुक्यातील सर्वात श्रीमंत व मोठ्या म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसी च्या बाजूला असलेल्या इयत्ता १ ते ८ वी वर्ग असलेल्या या शाळेत १८५च्या आसपास विद्यार्थी आहेत, ८ शिक्षिका असून केवळ एक पुरुष शिक्षक आहे. या शाळेत गेल्या ९ महिन्यापासून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही, पाईपलाईन कट झाल्याने ही गैरसोय निर्माण झाली आहे. ऐवढेच नव्हे तर इयत्ता १, ४, ६, आणि ८ च्या वर्ग खोल्या गळत असल्याने पावसाळ्यात वर्गात ठिंबक सिंचन सुरू असते, यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात शाळेत पाण्याची सोय व्हावी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक रायकर सर यांनी ग्रामपंचायत म्हारळ यांचेकडे पत्रव्यवहार देखील केली आहे. तर ग्रामपंचायत सदस्या अमृता महेश देशमुख यांनी आमदार कुमार आयलानी यांनी पत्र पाठवून ही समस्या कळविले आहे, तर आमदारांनी या बाबतीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून याकडे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
तसे पाहिले तर तालुक्यातील १२० शाळेपैकी यातील १५/२० शाळा नादुरुस्त आहेत. काही मोजक्या शाळा सोडल्यास इतर शाळांची म्हणावी तशी चांगली स्थिती नाही. लाद्या उखडलेल्या, मोडलेल्या खिडक्या दरवाजे, पडलेल्या संरक्षक भिती, गळके वर्ग ,उशिरा येणारे शिक्षक, हे तालुक्यातून हद्दपार होत नाही. या बाबतीत पंचायत समितीचे उपसभापती भरत गोंधळे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना बोलावून शिक्षकाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
म्हारळ जिप शाळेची तर खूपच भयानक परिस्थिती आहे, पाणी नसल्याने महिला शिक्षक, व विद्यार्थीनीची खूपच कुंचबना होत आहे.
शौचालयाचा अभाव, अंगणवाडीची समस्या, कचरा, शाळेच्या बाजूला पडक्या खोल्या असल्यामुळे कित्येक चोरीच्या घटना घडलेल्या असून, गर्दूले, दारुडे, भटके, गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे लोक या ठिकाणी वास्तव करतात त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना धोका संभवतो. शाळेत सीसीटीव्ही असूनही चोरीचे प्रकार घडत असतात.
विद्यार्थ्यांची पाण्याची तात्पुरती सोय व्हावी म्हणून ग्रामपंचायतीने आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार रुपयांचे पाण्याचे बाटला पुरवले आहेत. लवकर कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्यात येईल असे ग्रामसेवक श्री कुटेमाटे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया....
*ग्रामपंचायतीने आतापर्यंत ३५०० रुपयांचे पाणी बाटला शाळेस पुरवले आहेत, लवकर पाणी लाईन टाकण्यात येईल,- सौ प्रगती कोंगिरे, सरपंच, म्हारळ, ग्रामपंचायत, ता कल्याण.
*जिल्हा परिषद शाळा म्हारळ ची खूपच वाईट अवस्था आहे, पिण्याच्या पाण्यासह रस्ता, कचरा, पाणी गळती, शौचालय आदी सोईसुविधा ची वाणवा आहे, आपण आमदार महोदयांच्या कडे पत्रव्यवहार केली आहे -सौ अमृता महेश देशमुख, सदस्यां, म्हारळ ग्रामपंचायत.
*शाळेस पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार केला आहे.-श्री रायकर सर, मुख्याध्यापक, म्हारळ जिप शाळा.




No comments:
Post a Comment