*.... अखेर त्या जातीयवादी पोलीसावर गुन्हा दाखल.*
_अन्याय अत्याचार निर्मुलन समितीने फोडली अन्यायाला वाचा._
कल्याण (दिपक मागाडे) - संविधानाबाबत व राष्ट्रपुरुषांबाबत अवमानकारक वाट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या परमेश्वर आव्हाड या पोलीसावर अखेर महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, कल्याण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची सविस्तर हकीकत अशी की, १४ जुन २०२२ रोजी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी जातीयवादी पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर आव्हाड याने त्याच्या व्हाट्सअप स्टेटसवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे आरोप करणारे संविधानाबाबत गैरसमज निर्माण करुन देणारे तसेच धार्मिक व जातीय तेढ निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस ठेवुन समाज माध्यमातून त्यांने प्रसार केला आहे. परमेश्वर आव्हाड हा रेल्वे पोलीस सेवेत कार्यरत आहे. त्याने जातीय द्वेष भावनेतून समाजमाध्यमावर राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे आरोप निर्माण करणारे स्टेटस ठेवले होते त्यामुळे समस्त बौद्ध समाजाला व भारतीयांना ज्यांच्या बद्दल नितांत आदर आहे अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांचे बद्द्ल अनादर व्यक्त केलेला आहे. संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांची विचारधारा स्विकारणा-या समस्त भीम अनुयायी यांचे बद्दल वाईट भावना व्यक्त करुन त्यांना हिन लेखणीने धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने समाजमाध्यमातुन लिखीत मत प्रसारीत करण्याचा गंभीर व फौजदारी स्वरुपाचा गुन्हा केलेला असल्यामुळे अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे प्रदेश-सरचिटणीस अण्णासाहेब पंडीत यांनी परमेश्वर आव्हाड यांचे विरुद्ध भादवि.संहितेचे कलम १५३ (अ) (ब), ५०५(२), २९५(अ), ४९९ सह ॲट्रोसिटी कायद्याचे कलम ३(१)(यु), ३(१)(व्ही), ३(२) (५-ए) तसेच राष्ट्र सन्मानाच्या अप्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियम १९७१-चे कलम २ अन्वये महात्मा फुले चौक पोलीस ठाणे कल्याण येथे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त कल्याण हे करीत आहेत.


No comments:
Post a Comment