एक ऑगस्ट रोजी शेतमजूर संघटनांचा राष्ट्रव्यापी एल्गार !
*जळगावला संयुक्त एकजुटीचे धरणे*
चोपडा/ जळगाव, बातमीदार.. अखिल भारतीय शेतमजूर संघटनांवर काम करणाऱ्या 5 राष्ट्रीय संघटनांची 16 मे 2022रोजी दिल्ली येथे का हरकिसनसिंग सुरजित भवन मध्ये झालेल्या परिषदेतील निर्णयानुसार येत्या एक ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर भारतीय खेत मजदूर युनियन ,अखिल भारतीय शेत कामगार संघटना,अग्रगामी किसान संघटना व इतर पाच संघटनांनी देशभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे
त्यानुसार जळगाव येथे ही जिल्हाधिकारी कार्यालय वर एक आगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंती दिनी लाल बावटा शेतकरी युनियन, शेतमजूर युनियन मोर्चा ,मार्क्स फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे विचारानच्या समविचारी संघटना व जिल्ह्यातील शेतमजुरांच्या मध्ये कार्य रत संघटनांचे एकजुटीचे धरणे आंदोलन सकाळी 11 .30 ते 1वाजे दरम्यान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतमजुरांच्या प्रमुख मागण्या अशा.. अन्न धान्य औषधी खते यावरील जी एस टी रद्द करा महागाईला लगाम घालावा अग्निवि र योजना रद्द करून पूर्वीचे कायद्यानुसार लष्कर भरती करा.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रास्त वेतन मिळावे केरळ राज्य धर्तीवर शेतमजुरांची रास्त किमान वेतन मिळावे शेत मजुरांना दरमहा 60वर्षे वयानंतर 3000रू पेन्शन देण्यात यावी. शेतमजुरां साठी केंद्रीय कायदा करण्यात येऊन त्यात सामाजिक सुरक्षा समावेश करावा.
शेतमजुरांना घरकुलासाठी पाच लाखाचा निधी देण्यात यावा अपूर्ण घरकुले चे थकीत अनुदान द्या. बेघर यांना ते राहत असलेली जागा नावे करण्यात यावी, जागा नसल्यास एक हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी. शेतमजुरांना जोड धंदेसाठी अनुदान पात्र कर्ज देण्यात यावी. जंगल गायरान जमिनीवरील भूमिहीनांची अतिक्रमणे कायम करण्यात यावी.
आदिवासी यांना वनाधिकार कायद्याअंतर्गत केलेले अपील अर्ज मंजूर करण्यात यावी. व वन जमीन वाटपाचा प्रश्न सोडवावा. तापी नदी काठावरील अतिक्रमित शेत्मजुराची जमिनी नावावर करा.
शहरी भागातही मनरेगा कायद्याचा अंमल व्हावा.
अन्नसुरक्षा योजनेत शिधा पत्रिकेवर सर्व जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात आदी मागण्यांसाठी संयुक्त धरणे आंदोलन करणेत येणार आहे.
तरी या आंदोलनात जिल्यातील शेतमजूर वर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन शेतमजूर संघटनेचे तर्फे कॉम्रेड अमृत महाजन, प्रा प्रकाश चौधरी, लक्ष्मण शिंदे, विजय पवार, वाल्मीक महिराले, विकास आळवणी, अरमान तडवी, शशिकला निंबाळकर, दामू कोळी, संतोष कुंभार, जिजाबाई राणे,काळू कोळी, प्रेमसिंग बारेला, सुकदेव भिल, हिराबाई सोनवणे, बाळू कोळी, विजय मोरे, पंडित माळी, वासुदेव कोळी, शांताराम पाटील ताराबाई माळी, बळीराम ढीवर, सुधाकर बिरारी ,मालू सोनवणे, मधुकर मोरे, अशोक सपकाळे, वसंत पाटील व इतर सर्व मार्क्स, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे विचाराने प्रेरित कार्य करणारे पक्ष व संघटना पदाधिकारी/ कार्यकर्त्यांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन केले आहे

No comments:
Post a Comment