Wednesday, 20 July 2022

मासू गावचे जेष्ठ समाजसेवक कै. रुपाजी तानु मास्कर यांचे मुबंईत उपचारादरम्यान दुःखद निधन.!

मासू गावचे जेष्ठ समाजसेवक कै. रुपाजी तानु मास्कर यांचे मुबंईत उपचारादरम्यान दुःखद निधन.!


*[ निवोशी / गुहागर : श्री उदय दणदणे ]*

गुहागर तालुक्यातील मासू गावचे गावप्रमुख तसेच स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थानचे गावकर कै. रुपाजी तानु मास्कर यांचे अल्पशा आजाराने जैन क्लिनिक हॉस्पिटल गिरगाव मुंबई येथे  उपचारादरम्यान सोमवार दिनांक.१८ जुलै २०२२ रोजी दुःखद निधन झाले.

कै. रुपाजी मास्कर यांनी काही वर्षे मुबंईत नोकरी केली परंतु सामाजीक कार्याची आवड असणारे कै. रुपाजी मास्कर हे मुबंईत जास्त काळ रमले नाहीत. गावचा विकास हाच नेहमी त्यांचा ध्यास राहिला गावच्या मातीशी जोडलेली नाळ त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं अखेर त्यांनी गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.गावी स्थायिक होताच आपली वडिलोपार्जित गावकरकी सांभाळत सामाजीक , शैक्षणिक, कला क्षेत्रात गावच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेत असत.

मासू गावचे श्रद्धास्थान स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थानची गेली ४५ वर्षे पुजारी राहून सेवा केली होती. धार्मिक गोष्टींचा गाडा अभ्यास असणारे कै. रुपाजी मास्कर यांची ग्रामदैवत श्री स्वयंभू सोमेश्वर प्रति अपार श्रद्धा होती.

गुहागर तालुका विकासाचे प्रेरणेते स्वर्गीय डॉ. श्रीधर (तात्यासाहेब) नातू यांचे ते निकटवर्तीय निष्ठावंत कार्यकर्ते होते. स्वर्गीय.तात्यासाहेब नातू यांच्या मार्गदर्शनाखाली गावात वीज, पाणी, रस्ते अशी प्रामुख्याने विकासाची कामे त्यांच्या कारकिर्दीत झाली.

गावात कोणी लहान असो मोठा सर्वांना नम्रपणे आदर देत अनेकांच्या सुख-दुःखात मदतीला धावून जाणारे कै. रुपाजी मास्कर यांच्या अचानक जाण्याणे संपुर्ण मासू गावात शोक व्यक केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुलगे , सुना, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या दुःखात शोकाकुल समस्त मास्कर परीवार ,ग्रामविकास मंडळ- मासू ग्रामीण मुबंई सहभागी होत कै. रुपाजी तानु मास्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...