Tuesday, 26 July 2022

राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणाचा व फसव्या आश्वासनाचा प्रवाशांना त्रास .!! **ठेकेदार व अधिकार्‍यावर कारवाईची मागणी - रमेश हिंदुराव **

राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणाचा व फसव्या आश्वासनाचा प्रवाशांना त्रास .!! **ठेकेदार व अधिकार्‍यावर कारवाईची मागणी - रमेश हिंदुराव **


मुरबाड ( मंगल डोंगरे ): कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दोन -तीन वर्षांपासून, म्हारळ ते पाचवा मैल पर्यन्त मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने रात्रंदिवस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व वाहन चालकांना प्रंचड प्रमाणात त्याचा त्रास होत असुन, आतापर्यंत या खड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन, दोन नागरीकांचे अपघातात प्राण ही गेले आहेत. याशिवाय खड्ड्यामुळे वाहने नादुरुस्त होतात. मणक्याचे आजार वाढतात. सामान्य नागरिकांना व प्रवाशांना हा त्रास होऊ नये. यासाठी अनेक सामाजिक संघटना व आम्ही सतत तिन वर्षे आंदोलने केली आहेत. त्यामुळे तात्पुरती मलम पटटी केली जाते. मागील वर्षीही २८ । ९ । २०२१ रोजी आम्ही उपोषणास बसलो असता रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम ७ आक्टोंबर २० २१ पासुन सुरु होईल असे कार्यकारी अभियंता यांनी लेखी पत्र दिले. मात्र सदरचे काम जानेवारी नंतर सुरू करून ते अत्यंत धिम्या गतीने चालू आहे .फक्त साधारण ५०० मीटर DLC केली आहे. ९ महिने होऊन ही १ फुटाचेही काँक्रिटी करण केले नाही. ही गंभीर बाब आहे .फक्त DLC थोड्या प्रमाणात केली आहे. उर्वरित रस्तावर खड्डे पडतात. हे माहिती असूनही त्यावर डांबरी कारण केले नाही. ह्या मुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे.या खड्ड्यामुळे प्रवासी लोकांना खूप त्रास होत आहे. अधिकाऱ्यांच्या या अशा वागण्यांमुळे बेजबादारपणामुळे नागरिकांना त्रास होतो. ह्या मुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी ह्यांच्या कडे केली आहे .ह्याची दाखल न घेतल्यास लवकरच उग्र आंदोलन केले जाईल असे रमेश हिंदुराव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन ! पेण (पंकजकुमार पाटील) :  पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ता...