Saturday, 2 July 2022

नापणे येथील मातृतुल्य मातोश्री स्वर्गीय प्रभावती रघुनाथ माने यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन !!

नापणे येथील मातृतुल्य मातोश्री स्वर्गीय प्रभावती रघुनाथ माने यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन !!


भोम पुनर्वसन |  प्रतिनिधी
नापणे येथील मातृतुल्य मातोश्री स्वर्गीय प्रभावती रघुनाथ माने यांचे वृद्धापकाळाने दिनांक 29 जून 2022 रोजी रात्रो 9 वाजता दुःखद निधन झाले.वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वैभववाडी तालुक्यातील नापणे गावच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सहकार,आणि शेती क्षेत्रातील अग्रणी प्रगतशील शेतकरी, आदर्श शिक्षक, स्वर्गीय रघुनाथ बाजीराव माने (माने गुरुजी) यांच्या  स्व.प्रभावती रघुनाथ माने या पत्नी होत्या.        

स्वर्गीय मातोश्री प्रभावती रघुनाथ माने यांचा रविवार दिनांक 10 जुलै 2022 रोजी 12 वा दिवस आहे. त्यांचे संपूर्ण उत्तर कार्य नापणे येथील त्यांच्या जिव्हाळा या निवासस्थानी होणार आहे.

पितृतुल्य स्वर्गीय रघुनाथ बाजीराव माने, (माने गुरुजी) आणि मातृतुल्य मातोश्री स्वर्गीय प्रभावती रघुनाथ माने यांच्या मागे प्रेमदत्त रघुनाथ माने सुपुत्र, सून, मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मातृतुल्य मातोश्री स्वर्गीय प्रभावती रघुनाथ माने यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एका पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या निधनाने माने आणि परिवारामध्ये दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

स्वर्गीय मातोश्री, प्रभावती रघुनाथ माने यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली ! विनम्र अभिवादन !!

No comments:

Post a Comment

'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !

'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !  आमच्या आयुष्याचं केलं सोनं  देहाचे झिजून केले चंदन... ज्ञानाच्या महासागराला  अ...