Friday, 22 July 2022

मा. उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व मा. अजितदादा पवार यांना वाढदिवस अभीष्टचिंतन !

मा. उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व मा. अजितदादा पवार यांना वाढदिवस अभीष्टचिंतन !


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मा. उपमुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते मा.ना.श्री. अजितदादा पवार यांचा आज दि. २२ जुलै रोजी ६३ वा वाढदिवस पण अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू. पशुधनाची झालेली हानी, शेतजमीन व पिकांचे नुकसान, घरांची दुकानांची पडझड या सगळया पाश्र्वभूमीवर वाढदिवस न करण्याचा मी निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे.


संपूर्ण महाराष्ट्रात आज २२ जुलै रोजी  राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विविध सेलच्या माध्यमातून  कार्यकर्त्यांनी उत्साहात, विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. तसेच लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

दादांचे जवळचे सहकारी, राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, माजी सिडको अध्यक्ष व स्थानिक ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदूराव यांनी आज अजितदादांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. अजितदादा सारखे वक्तशीर, कणखर तसेच समाजाची जाण असणारे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे परम भाग्य, आज माझ्या राजकीय प्रवासात अजितदादांचे खूप योगदान राहिले आहे असे सांगितले. 

मा. अजितदादा पवार यांची भेट घेऊन प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी लाख लाख शुभेच्छा दिल्या.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...