कल्याण तालुक्यात पहिला डेंग्यू चा संशयित रुग्ण, गटविकास अधिका-यांची तात्काळ पाहणी, ग्रामपंचायतीस खबरदारीच्या सूचना !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या स्टार रेसिडेन्सी इमारतीत राहणाऱ्या सागर दशरथ पाटणे यांच्या मध्ये डेंग्यूची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांना ताबडतोब गोवेली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना वैद्यकीय अधिका-यांनी उपचार करून घरी सोडले आले असले तरी त्यांचा रक्त तपासणी रिपोर्ट अद्याप प्राप्त झाला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी तात्काळ या भागाची पाहणी करून, ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.
कल्याण तालुक्यातील सध्या व्हाँयरल फिवर ची जबरदस्त साथ आहे, अशातच घोटसई ग्रामपंचायत हद्दीतील स्टाँर रेसिडेन्सी या इमारतीत राहणारे सागर दशरथ पाटणे वय २९ वर्षे यांनी सुरुवातीला ताप आला, त्यामुळे त्यांनी टिटवाळयातील चिंतामणी हाँस्पिटल येथे किरकोळ उपचार केले. व डाँक्टरांच्या सल्लानुसार रक्त तपासणी केली असता त्यांना टायफॉईड असल्याचे निदान झाले, पुढील उपचार घेऊनही ताप थांबत नसल्यामुळे ते ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे भर्ती झाले. येथे रक्त तपासणी केली असता प्लेटलेट्स कमी झाल्याचे समजले, त्यामुळे यांना डेंग्यू झाला किंवा नाही याची पुढील तपासणी करण्यासाठी रक्ताचे नमुने सिव्हिल हाँस्पिटल ठाणे येथे पाठविण्यात आले.
हे समजतात कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी ताबडतोब तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ यांच्याशी चर्चा करून सूचना दिल्या. त्यांनी सर्व आरोग्य विभागाचे पथक पाठवून या भागाचे सव्हेक्षण करून परिसरात आळया आहेत का याची पाहणी केली.
तर गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी तात्काळ घोटसई ग्रामपंचायतीस भेट देऊन पेंशट संदर्भात माहिती घेतली, शिवाय तो राहत असलेल्या इमारती ची पाहणी करून गोवेली ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली यावेळी त्यांच्या सोबत ग्रामसेवक जयवंत मोरे,सरपंच सुयोग मगर,सदस्य राजेंद्र वामन मगर आदी उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी सर्व ग्रामपंचायतींनी योग्य प्रमाणात टी सी एल वापरून पाणी स्त्रोत शुध्दीकरण दक्षता घ्यावी, तसेच मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, वा इतर आजार अथवा साथ उदभवू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशा सूचना दिल्या.
यावेळी अंत्यत वेगाने सुत्रे हलविल्या बद्दल कार्यतत्पर व कार्यक्षम गटविकास अधिकारी अशोक भवारी यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.





No comments:
Post a Comment