Saturday, 23 July 2022

मुरबाड मध्ये विजेचा शाँक लागुन महावितरण कर्मचाऱ्यांचा मृत्यु..

मुरबाड मध्ये विजेचा शाँक लागुन महावितरण कर्मचाऱ्यांचा मृत्यु..


मुरबाड ( मंगल डोंगरे ) :-- महावितरण च्या हलगर्जीपणामुळे जितेंद्र पवार हा कर्मचारी ट्रान्सफॉर्मर वर काम करत असताना शाॅक लागुन मृत्यू झाल्याची घटना घडली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .


           तालुक्यातील महावितरण च्या बेजबाबदार कामभारामुळे अनेक नागरिकांचे बळी जात असताना शुक्रवारी सायंकाळी सहाचे सुमारास जितेंद्र पवार हा कर्मचारी कुडवली घुट्याची वाडी येथे काम करत असताना त्यांचे सोबत असलेल्या भाऊ शिंगळे व दळवी या कर्मचारी असताना कुणीतरी मेन लाईन चालु केली आणि जितेंद्र पवार हा ट्रान्सफॉर्मर चढुन काम करत असताना त्याला शाॅक लागुन त्याचा अकस्मात मृत्यू झाला हा प्रकार नागरिकांना समजताच त्यांनी आरडाओरड केली . 


आणि हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदाय महावितरण च्या या कारभारामुळे संतप्त झाला असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी संतप्त झालेल्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत पवार यांचे मृत्युस जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन देत अग्निशमन दलाचे सहाय्याने मृतदेह खाली उतरविण्यात आला. व शवविच्छेदनासाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उच्चस्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...