मांडा पश्चिम शिवसेना शाखाप्रमुख ज्ञानेश्वर मढवी यांच्या पत्राची घेतली सुहास गुप्ते यांनी दाखल
"प्रत्यक्ष रस्ते दुरुस्ती करिता सुरुवात झाल्याने नागरिक समाधानी"
टिटवाळा, संदीप शेंडगे : मांडा पश्चिम येथील रस्ते दुरुस्ती करिता शिवसेना मांडा पश्चिमचे शाखाप्रमुख ज्ञानेश्वर मढवी यांनी सहाय्यक उपायुक्त सुहास गुप्ते यांना तातडीने पत्रव्यवहार करून रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली होती या मागणीची तातडीने दखल घेत दोनच दिवसात प्रत्यक्ष रस्ते दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक १० मध्ये वासुंद्री रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे साचले होते. पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत होते. रस्त्याचे डब्यात रूपांतर झाले होते. येथील रस्त्यांवरून जाणे कठीण झाले होते वाहन चालकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले होते त्यातच शाळकरी विद्यार्थी, महिला, गरोदर स्त्रिया वयोवृद्ध यांना रस्त्याने चालणे अतिशय कठीण झाले होते.
या समस्येकडे कोणीही लक्ष देत नव्हते याकरिता ज्ञानेश्वर मडवी यांनी पुढाकार घेऊन रस्ते दुरुस्ती करिता सहाय्यक उपायुक्त तथा अप्रभाक्षेत्र अधिकारीसुहास गुप्ते यांची भेट घेऊन रस्ते दुरुस्ती करण्याची त्यांना तातडीने मागणी केली.
अ प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा सहायक उपायुक्त सुहास गुप्ते यांनी तातडीने ठेकेदाराला आदेश देऊन वासुंदरी रोडवरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले दोनच दिवसात प्रत्यक्षात खड्डे बुजविण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी ज्ञानेश्वर मढवी यांचे आभार व्यक्त केले.




No comments:
Post a Comment